बुलडाणा: बुलडाणा शहरात वर्ष १९५७ मध्ये स्थापन झालेले जिल्हा ग्रंथालय हे आज ५८ व्या वर्षीसुद्धा विद्यार्थी वाचक वर्गासाठी दीपस्तंभ म्हणून काम करीत आहेत. येथे उपलब्ध असलेली विविध गं्रथसंपदा, मासिके, बालसाहित्य, वृत्तपत्रे यामुळे युवा वाचकांसह सर्व वयोगटातील वाचकांना प्रेरणा मिळत आहे.जिल्ह्यात असलेली ३0४ शासन मान्यताप्राप्त ग्रंथालये नेहमीच वाचनासाठी प्रेरणांचे स्रोत ठरले आहे. त्यामुळे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस पहिल्यादांचा १५ ऑक्टोबर रोजी ह्यवाचक प्रेरणादिनह्ण म्हणून जिल्ह्यातील सर्व गं्रथालयातून साजरा होणार आहे. शहरात असलेले जिल्हा ग्रंथालयाची यात महत्वाची भुमिका आहे. या ग्रंथालयाचा ९0 टक्के वाचक वर्ग ग्रामीण भागातील मुलामुलींचा आहे. शिवाय सकाळी ८ ते सायंकाळी ८ अशी १२ तासाची वाचन सेवा वाचक वर्गाला ग्रंथालयातून नि:शुल्क पुरविण्यात येते. त्यामुळे विविध स्पर्धा परिक्षांची तयार करणार्या वाचक विद्यार्थ्यांंंंसाठी जिल्हा ग्रंथालय आज प्रेरणादायी ठरले आहे. *सामाजिक कार्याची झालरजिल्हा ग्रंथालयाच्या वाचन प्रेरणा संस्कृतीला सामाजिक कार्याची झालर लाभली आहे. गं्रथालयाकडून वाचकांसाठी वर्षातून सहा ग्रंथ प्रदर्शन, शिवाय मुलामुलींना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जाते. याशिवाय जिल्हा कारागृहात कैद्यासाठी चालविल्या जाणार्या वाचनालयास मोफत पुस्तक पुरविले जाते.*१ लाख ३0 हजार ग्रंथसंपदाजिल्हा गं्रथालयाचे ३७00 वाचक तसेच १८१ संस्था सभासद आहे. या वाचकांना प्रेरणा देण्यासाठी गं्रथ आणि पुस्तकांनी नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. येथील जिल्हा ग्रंथालयात १ लाख १0 हजार ग्रंथ व संदर्भगं्रथ आहेत. याशिवाय २0 हजार स्पर्धा परीक्षा पुस्तक, माहिती पुस्तक, बालसाहित्य, विविध धर्मग्रंथ, शब्दकोष, विश्वकोश, ७0 मासिके, ३0 वृत्तपत्रे वाचकांसाठी नि:शुल्क उपलब्ध आहे.