शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST

संदीप वानखडे बुलडाणा : आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातून काेराेना परतीच्या मार्गावर असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात ...

संदीप वानखडे

बुलडाणा : आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातून काेराेना परतीच्या मार्गावर असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात साेमवारी केवळ १६ सक्रिय रुग्ण असून, अनेक तालुक्यांमध्ये गत काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडले नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेची भीषणता आराेग्य विभागासह सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवली आहे. गत काही दिवसांपासून आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे, तसेच नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९९.२१ टक्क्यांवर पाेहोचला आहे, तसेच साेमवारचा पाॅझिटिव्हिटी रेट अवघा ०.५७ टक्के हाेता. नागरिकांनी यापुढेही नियमांचे पालन केल्यास जिल्हा लवकरच काेराेनामुक्त हाेणार आहे.

तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच रुग्णसंख्या कमी झाल्याने ग्रामीण भागात नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे, तसेच फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे आदी बाबींचा सर्वसामान्यांना विसर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धाेका पाहता नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी केवळ एक रुग्ण सक्रिय

जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सक्रिय आहे, तसेच मलकापूर तालुक्यात एकही रुग्ण नसल्याचे चित्र आहे. एक रुग्ण असलेल्या तालुक्यांमध्ये चिखली, देऊळगाव राजा, लाेणार, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, माेताळा आदी तालुक्यांचा समावेश आहे, तसेच बुलडाणा, सिंदखेडराजा आणि जळगाव जामाेद तालुक्यात प्रत्येकी दाेन रुग्ण सक्रिय आहेत.

बाजारपेठेमध्ये हाेतेय गर्दी

गत काही दिवसांपासून ग्रामीण भागातही काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने नागरिक निर्धास्त झाल्याचे चित्र आहे. बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात बाजारपेठेत माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. अनेक जण विनामास्क फिरत असल्याने काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र, जिल्हा काेराेनामुक्त हाेत असल्याचा अंदाज वर्तविणे आता थाेडे घाईचे हाेईल. आणखी आठ दिवस अशीच स्थिती राहिल्यास काेराेनामुक्तीकडे वाटचाल असे म्हणता येईल. काेराेनाची संभाव्य तिसरी लाट पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

डाॅ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा

जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ०.५७ टक्के

बरे हाेण्याचे प्रमाण ९९.२१ टक्के

मृत्यूदर ०.७६ टक्के