शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीत पोलीस बंदोबस्तात पाणी वितरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 09:01 IST

अत्यल्प पावसामुळे चिंचोलीतील विहिरी , बोअरवेल, नाले कोरडेठण्ण पडले असून परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटलेत.

- अनिल उंबरकर

शेगाव: तालुक्यातील चिंचोली (कारफार्मा) येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली  आहे. त्यामुळे शासनाकडून टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात येत आहे. दरम्यान, पाण्यासाठी होत असलेली भांडणं आणि संघर्ष पाहता पोलीस बंदोबस्तात टँकरच्या  पाण्याचे वितरण करण्यात येत आहे.अत्यल्प पावसामुळे चिंचोलीतील विहिरी , बोअरवेल, नाले कोरडेठण्ण पडले असून परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटलेत. ऐन पावसाळ्यातही या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष कायम होता.  त्यामुळे सरपंच संजय इंगळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक संजय हाके यांनी पंचायत समिती व तहसिल कार्यालयात पाणी टंचाईचा अहवाल सादर केला. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली. त्यानंतर या गावात पाण्याचे टँकर सुरू झाले. मात्र, टँकरचे पाणी भरण्यासाठी होत असलेली चढाओढ आणि संघर्ष पाहता याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पाण्याचे वितरण करण्यात येत आहे.टँकर गावात येण्यापूर्वीच लागतात रांगा! पाण्याचा टँकर गावात येण्यापूर्वीच सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापासून नागरिक या टँकर झडप मारतात. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, तसेच सर्वांना समान पाणी वाटपासाठी याठिकाणी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात टँकर द्वारे पाणी वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. 

गावातील स्थिती पाहता पाण्यासाठी वाद विकोपाला जावू नये, गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता पोलीस बंदोबस्त मागितला असून, पोलिस बंदोबस्तातच पाणी वितरीत केले जात आहे.-पी.आर.वाघगटविकास अधिकारीपंचायत समिती ,शेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणा