शाळेचा विकास करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन मुख्याध्यापक म्हस्के यांनी यावेळी केले़ डॉ. प्रवीण नरवाडे यांनी शाळेसाठी एक लाख रुपये मदत दिली़ त्याचे मुख्याध्यापकांनी यावेळी आभार मानले़ यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर, सरपंच शकुंतलाबाई महाले ,उपसरपंच रुक्मिणीबाई काटोले व ग्रामपंचायत सदस्य शेषराव सावळे,नंदकिशोर देशमुख,गजानन लांडे,गणेश नरवाडे,किरण उगले,कृष्णा सिनकर,ताराबाई फुसे, मथुराबाई भुते,शिवगंगा पवार शाळा समिती अध्यक्ष लताबाई आल्हाट व इतर शाळा समिती सदस्य, पत्रकार मधुकर महाले,किरण देशमुख,डॉ. प्रवीण नरवाडे संभाजी देशमुख,मधुकर सिनकर,दादाराव महाले,सुभाष पवार व इतर पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते़ कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक म्हस्के व शिक्षक जोमाळकर ,जाधव ,रंगदळे ,सोनटक्के ,सावंत ,धांडे आदींनी परिश्रम घेतले़
जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST