अनिल गवई/खामगाव(बुलडाणा)शहरात सार्जया होणार्या शांती महोत्सवात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्यातील भाविक आई जगदंबेचरणी (मोठी देवी) आपली श्रद्धा प्रकट करतात. या महोत्सवात हजारो भाविकांनी दान केलेले विविध साहित्य नि:स्वार्थ भावनेने गरीब, गरजवंतांना वाटप केल्या जाते. गेल्या शंभर वर्षांंपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. त्यामुळे आजवर दरवर्षी हजारो ह्यओटींह्णसह साड्यांचे वितरण करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविल्या जात असल्याने ह्यतेरा तुझको अर्पण..ह्ण या ओळींची प्रचिती श्री जगदंबा (मोठी देवी) सार्वजनिक उत्सव मंडळाकडून ठायीठायी येत आहे.विजयादशमीला असुरांचा संहार केल्यानंतर क्रोधीत झालेल्या देवीला शांत करण्यासाठी कोजागिरी पोर्णिमेपासून पुढील अकरा दिवस मोठी देवीची मनोभावे पूजा-अर्चा करणारे खामगाव हे शहर राज्यातील एकमेव शहर आहे. सन १९0८ पासून अखंडितपणे शांती उ त्सव साजरा होत असतो. सेवाभाव या प्रमुख वैशिष्ट्याला मंडळाचे पदाधिकारी श्रद्धेने जपत आहेत. आतापर्यंंत मंडळाने कोट्यवधी ओटींचे आणि साड्यांचे वितरण केले आहे. ही परंपरा केवळ शांती महोत्सवातच राखल्या जात आहे. *घरात वर्षभर ठेवली जाते ओटीशांती उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले भाविक साडी, चोळी, खण, नारळासह देवीची ओटी भरतात व मोठी देवीचे मनोभावे दर्शन घेतात. मोठी देवीच्या दरबारात दाखल होणार्या प्रत्येक भाविकाला लहान देवी मागील सभागृहात ओटी आणि पूजेचे साहित्य दिले जाते. या सभागृहातून शांती उत्सवात २४ तास ओटींचे वितरण केल्या जाते. एका दिवशी सरासरी ८00 ते ९00 ओटींच्या वितरणाच्या या परंपरेला शतकाचा कालावधी लोटल्याने आतापर्यंंत कोट्यवधी ओटींचे वाटप मंडळाकडून झाले आहे. ही ओटी भाविक वर्षभर घरात ठेवतात. पुन्हा दुसर्यावर्षी दर्शनाला आल्यानंतर नवीन ओटी मिळाली की, जुन्या ओटींचे भाविक विसर्जन करतात. त्यामुळे देवीच्या दरबारातून मिळणार्या ओटींचे भाविक मनोभावे वर्षभर पूजन करतात.
शांती महोत्सवात हजारो ‘ओटीं’चे वितरण !
By admin | Updated: October 16, 2014 23:35 IST