सरपंच बिलाल गायकवाड, उपसरपंच कौतिक नरोटे यांच्यासह ग्रा.पं. सदस्य यांच्या हस्ते गावातील एका कुटुंबाला पूर्ण कर भरल्याने येथे वाफेचे मशीन देण्यात येऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली़ सध्या कोरोनाचा होणारा फैलाव पाहता ग्रामीण भागातील गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनोज दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा.पं. जामठी यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे़ यावेळी ग्रा.प. सदस्य सलीम खान, सुभद्रा खरात, गजानन तायडे, शेषराव तायडे, संजय तायडे, समाधान तायडे, विलास तायडे, भगवान तायडे, संतोष तायडे, प्रकाश तायडे, शैलेश सोनुने, शुभम तायडे, संदीप तायडे, कौतिकराव अंभोरे, गणेश पवार, संतोष तायडे, सागर गायकवाड, गणेश चिंचोले आदी उपस्थित हाेते़ काेराेनाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला़
जामठी ग्रामपंचायतीच्या वतीने वाफ यंत्राचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST