डोणगाव : दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा हा घातक असल्याने याबाबतशासनाच्या वतीने कडक नियम बजावले आहेत. मात्र डोणगावात या नियमांचीसर्रास पायमल्ली केली जात आहे. याकडे डोणगावातील डॉक्टरांबरोबरशासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दोन शाळांच्यामध्येराज्य महामार्गालगतच जैविक कचरा फेकून विल्हेवाट लावली जात आहे.जैविक कचऱ्यामुळे कावीळ, क्षयरोग, एड्स आदी सारखे गंभीर आजार होऊ शकतात.मात्र ग्रामीण भागात यासंदर्भात आवश्यक त्या प्रमाणात जनजागरण केले जातनाही. परिणामी गावातील नागरिकांना याचे कोणतेही गांभीर्य नाही. डोणगावपरिसरात लहान मोठे रुग्णालये आहेत. या दवाखान्यात निर्माण होणारा जैविककचरा सर्रास उघड्यावर टाकला जातो. गावातील व राज्य महामार्गाजवळ असलेल्यामदन वामन पातुरकर शाळेजवळ असलेल्या पूलाजवळ तर या कचऱ्याचा ढीगच पहावयासमिळतो तर राज्य महामार्गाच्या आजूबाजुलाही हा जैविक कचरा टाकलेला दिसूनयेतो. यामध्ये रक्ताळलेले कपडे, सलाईन, सिरिज, नळ्या, इंजेक्शन आदी कचरामोठ्या प्रमाणात दिसतो. या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाटलावण्याचे शासनाचे आदेश असताना मात्र डोणगावात हा कचरा उघड्यावर फेकूनदिला जातो. या राज्य महामार्गावरुन जाणारे विद्यार्थी कुतूहलाने याकचऱ्यातून इंजेक्शन, सलाईन नळ्या उचलतात. त्यामुळे डोणगाव येथे सदर जैविककचऱ्याचे व्यवस्थापन डॉक्टरांकडून केले जात नसल्याने व वैद्यकीय विभागाचेदुर्लक्ष असल्याने सर्रास राज्य महामार्गालगतच फेकून दिले जाते. नुकतेचतालुका वैद्यकीय अधिकारी सरतापे व त्यांच्या पथकाने डोणगावात दवाखान्याचीचौकशी केली तेव्हा त्यांना हा राज्य महामार्गालगतचा जैविक कचरा का दिसलानाही. याबाबतही जागरुक नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर डोणगावात कुणाकडेनर्सिंगचे परवाने व जैविक कचरा व्यवस्थापनाचा परवाना आहे. याबाबत सखोलचौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)असा आहे नियमडॉक्टरांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ बायोमेडीकल वेस्ट आधारेरजिस्ट्रेशन व बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार याबाबत जिल्हा वैद्यकीयअधिकारी यांचा परवाना घेणे आवश्यक आहे. यानंतर जैविक वैद्यकीय कचराउचलण्यासाठी विशेष वाहन ठरलेल्या तारखेत त्या गावात पाठविले जाते. हाकचरा त्याच वाहनात टाकणे आवश्यक आहे. हा कचरा रस्त्यावर किंवा भंगारातविकणे गैरकायद्याचे समजले जाते.
राज्य महामार्गाजवळच लावली जाते जैविक कचºयाची विल्हेवाट
By admin | Updated: April 12, 2017 13:43 IST