शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:46 IST

बुलडाणा : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्र दिव्यांगात येणार्‍या ९  प्रवर्गास दिले जाते. त्या प्रवर्गात १२ प्रवर्गांची वाढ करण्यात आली आहे; मात्र जनजागृती अभावामुळे नवीन समावेश १२ प्रवर्गाचे जवळपास ३0 हजारावर दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव नवीन १२ प्रवर्गांचा समावेश

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्र दिव्यांगात येणार्‍या ९  प्रवर्गास दिले जाते. त्या प्रवर्गात १२ प्रवर्गांची वाढ करण्यात आली आहे; मात्र जनजागृती अभावामुळे नवीन समावेश १२ प्रवर्गाचे जवळपास ३0 हजारावर दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आज केवळ नऊ दिव्यांग प्रवर्गात येणार्‍यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे मोजक्याच दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे.  केंद्राने १७ डिसेंबर २0१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. ९ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. यात पक्षाघातापासून ते कंपवात रोगाचा समावेश करण्यात आला आहे; मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ३0 हजारावर दिव्यांग बांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत. नवीन दिव्यांग बांधवांमध्ये १२ प्रवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अध्ययन अक्षम म्हणजे ज्याला वाचन, लेखन करण्यास अवघड जात असेल, उलटे अक्षर लिहित असेल त्याचाही समावेश दिव्यांगांच्या प्रवर्गात केला आहे. यासोबतच मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बुटकेपणा, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी म्हणजे मल्टिपल स्क्लेरोसिस, थॅलेसिमीया, अनुवांशिक रक्तविकार, सिकलसेल, अँसिड हल्ल्यात जखमी झालेले रुग्ण, कंपवात रोग यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी जनजागृतीची गरज असून, सर्वच स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

नवीन प्रवर्गाचा ३0 हजारांवर दिव्यांग बांधवांना फायदायापूर्वी दिव्यांगांसाठी केवळ ९ प्रवर्गांचा समावेश होता. केंद्राच्या नव्या कायद्यानुसार यात १२ प्रवर्गांची भर पडली आहे. यामुळे हा नवा कायदा जिल्ह्यातील जवळपास ३0 हजारांवर दिव्यांगांसाठी फायद्याचा ठरणार आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे.

सामाजिक कल्याण विभागाच्या  विविध योजनांचा फायदा नवीन प्रवर्गातील दिव्यांगांना देण्यास काहीच अडचण नाही. योजनांचा फायदा घेण्यासाठी दिव्यांगांचे प्रमाणपत्र असल्यास योजनेत समावेश करण्यात येईल.-मनोज मेरत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा.

दिव्यांगांच्या प्रवर्गात नवीन प्रवर्गाचा समावेश केल्यामुळे गोरगरिब, निराधार दिव्यांगांना फायदा होणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणा व अधिकार्‍यांचे सहकार्य अपेक्षित आहे.- नामदेव जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजपा अपंग आघाडी सेल, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा