बुलडाणा : पश्चिम वर्हाडातील सर्वात मोठय़ा असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला मंत्रीपदासाठी वेटींगवरच राहावे लागले आहे. सात विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने ३ व शिवसेनेने २ म तदारसंघ जिंकून युतीची पाठराखण केली; मात्र जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळाच्या विस् तारातही मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. विशेष म्हणजे दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गेल्या पंधरवड्यात बुलडाण्यात आलेल्या महसूलमंत्री ना.एकनाथ खडसे यांनी बुलडाण्याला मंत्रीपद मिळणार नाही, अकोला-बुलडाणा मिळून एकच मंत्रीपद राहील, असे वक्त व्य केले होते. आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पृष्ठभूमीवर ना.खडसे यांची वाणी खरी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तृळात होती.भारतीय जनता पार्टीच्या जन्माअगोदरपासून जनसंघामध्ये कार्यरत असलेले व त्यावेळी आमदार असलेले विद्यमान विधान परिषद सदस्य भाऊसाहेब फुंडकर हे भाजपचे दिग्गज व ज्येष्ठ नेतृत्व आहे. भाजपचे पहिले आमदार, अकोल्याचे खासदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अशा पदांवर काम केलेल्या या अनुभवी नेतृत्वाला पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र आता विस्तारातही त्यांना स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांचे संपूर्ण घराणेच संघ व भाजपामय आहे. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेल्या आ.संचेती यांच्या पाठीशी दीर्घ अनुभव आहे. त्यांचे पक्ष संघटने तील योगदान, पक्षङ्म्रेष्ठींशी असलेली जवळीक पाहता त्यांनाही मंत्रीपदाची संधी मिळेल, असा अनेकांचा होरा होता; मात्र आ.संचेती यांच्या पदरीही निराशाच आली आहे.डॉ.संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवित भाजपाचा झेंडा फडकवत ठेवला. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली संघटनेची बांधणी, सभागृहातील त्यांची चमकदार कामगिरी व कामाची तडफ पाहून नव्या रक्ताला संधी म्हणून त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी अटकळ होती; मात्र तीही फोल ठरली आहे. जिल्ह्यात भाजपचे चार व सेनेचे दोन अशा सहा आमदारांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यामुळे आता पुढील विस्तारात तरी संधी मिळेल का, ही शंकाच आहे? * सेनेची लॉटरीही हुकलीभाजपच्या दिग्गज नेत्यांच्याच पदरी अशी निराशा आल्याने शिवसेनेला फारशी आशा नव्हतीच. विदर्भात सेनेला केवळ चार जागा मिळाल्या असून, त्यापैकी दोन जागा बुलडाण्यात असल्याने सेनेला मंत्रीपद मिळाले असते तर ती ह्यलॉटरीह्णच असती; मात्र ही लॉटरीसुद्धा यवतमाळमध्ये खुलली आहे.
भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या पदरी निराशा
By admin | Updated: December 6, 2014 00:15 IST