शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडी : बुलडाण्यात ‘श्री’च्या पालखीचे उत्साहात स्वागत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:08 IST

बुलडाणा : संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण, गण गण गणात बोतेचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मोठय़ा भक्तीभावात  श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे मंगळवारला शहरात आगमन झाले असता, मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देपालखीचे भाविकांनी घेतले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण, गण गण गणात बोतेचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मोठय़ा भक्तीभावात  श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे मंगळवारला शहरात आगमन झाले असता, मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. सजवलेल्या रथात ठेवण्यात आलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती.धाड नाक्यावर सायंकाळी ६ वाजता पालखीचे आगमन झाले. शोभायात्रेच्या मार्गावर भाविकांनी फुलांचा सडा टाकला होता. पालखीवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. सद्गुरू श्री गजानन महाराज पायी दिंडी व पालखी सोहळ्यात औरंगाबाद येथील मंदिराचे विश्‍वस्त मंडळाचे प्रा.श्रीधर वक्ते सहभागी होते. नाक्यावर प्रा.जगदेवराव बाहेकर, रूपराव उबाळे यांच्यासह असंख्य भाविकांनी पालखीचे पूजन केले. हातामध्ये भगव्या पताका घेतलेले वारकरी, मुखाने श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करत, तर विविध भजनी मंडळे टाळ-मृदंगांच्या तालात भजने म्हणत शोभायात्रेत सहभागी झाली. मुखाने सद्गुरूंचे नामस्मरण करत गजानन भक्त भक्तिभावात तल्लीन होऊन गेले होते. शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चौक फुलांनी सजवण्यात आले होते. जागोजागी श्रींच्या पालखीचे भक्तांनी पूजन करून दर्शन घेतले. येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता. 

o्रद्धाभूमी-प्रगटभूमी पालखीचे धाड येथेही स्वागत‘गण गण गणात बोतेचा जयघोष’ करुन औरंगाबाद येथून गुरुवारी निघालेल्या o्रद्धाभूमी ते प्रगटभूमी या संतo्री गजानन महाराज यांचा पालखीचे सोमवारी धाड येथे आगमन झाले. बुलडाणा जिल्हय़ात या पालखीचे आगमन होताच गजानन भक्तांनी पालखीचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले. सजवलेल्या रथातील o्री गजानन महाराजांच्या पादुका आणि मुखवटा ठेवलेली पालखी धाड येथे सायंकाळी दाखल झाली. येथून ढोल ताशांच्या गजरात पालखी वाजत गाजत शाळेच्या प्रांगणात पोहोचली. फटाक्यांची आताषबाजी, पालखी मार्गावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या आणि पालखीवर करण्यात येणार्‍या पुष्पवृष्टीने वातावरण भक्तीमय बनले होते. जि.प.शाळेत पालखी दाखल झाल्यावर पुरुषोत्तम गुळवे, मधुकरराव गुळवे यांनी स्वागत केले. त्यानंतर आरती करण्यात आली.  यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्यात सुमारे २५0 वारकरी सहभागी झाले असून, महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर