शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

दुकानांची वेळ बदलल्याने अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

मासरूळ येथे तीन पॉझिटिव्ह बुलडाणा : तालुक्यातील मासरूळ येथे सोमवारी तीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागातही आता ...

मासरूळ येथे तीन पॉझिटिव्ह

बुलडाणा : तालुक्यातील मासरूळ येथे सोमवारी तीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागातही आता रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्टेट बँकेत फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर

मेहकर : येथील स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे. रांगेत उभे राहताना त्यांनी अंतर राखले नाही. बँक प्रशासनानेही गर्दी कमी करण्यासाठी दुसरे काऊंटर सुरू करण्याची गरज आहे. खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वॉटर एटीएमवर स्वच्छता राखण्याची गरज

बुलडाणा : सध्या वॉटर एटीएमवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी.

मंदिर परिसरात शुकशुकाट

सिंदखेडराजा : येथील रामेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. गळती सुरू होताच भाविकांचा ओढा मंदिराकडे असतो. परंतु यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने या ठिकाणी भाविकांचे येणे-जाणे बंद झालेले आहे.

कोरोनामुळे सलून व्यवसाय अडचणीत

धाड : कोरोनामुळे सलून व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. दुकाने बंद असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ब्यूटी पार्लर बंद असल्याने महिला व्यावसायिकांनाही चणचण जाणवत आहे.

भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करू नका!

बुलडाणा : नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मोकळ्या मैदानात बाजार भरवून भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली होती. मात्र तेथेही नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सची मर्यादा पाळली नाही. प्रशासनाच्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत.

चिमुकलेही करताहेत कोरोनाबाबत जनजागृती

किनगावराजा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी येथील एका मुलाने चक्क घराच्या भिंतीवर फलक लावून नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. घरीच थांबा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या अशा ओळी भिंतीवर लिहिल्या आहेत.

मास्क वापराला खो

देऊळगावराजा : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने सर्व शहरवासीयांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना तीन पदरी मास्क किंवा साध्या कापडी मास्कने नाक व तोंड झाकून वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेकांकडून मास्क वापरण्याला खो दिला जात आहे.

कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने धास्ती

साखरखेर्डा : येथे १९ एप्रिल रोजी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. साखरखेर्डासह परिसरातील गावांमध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये धास्ती पसरली आहे.

शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री सेवा

बुलडाणा : आपत्कालीन परिस्थितीत लागू असलेल्या संचारबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून तालुक्यात भाजीपाला व फळांची विक्री करण्यात येत आहे. कृषी विभागाकडून यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. बुलडाणा शहरातही ट्रॅक्टरच्या साहाय्याने विविध फळांची विक्री करण्यात येत आहे.