बुलडाणा : बुध्द जयंती निमित्त शहर व परिसरात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी शहरातून धम्म रॅली काढण्यात येवून बुद्धवंदना घेवून मान्यवर भंतेंनी धम्मदेसना दिली. मलकापूर रोड स्थित महाबोधी विहार धम्मगीरी येथे धम्मरॅलीचे विसर्जन झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमोल हिरोळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलींद बोंदडे, हिराबाई ओहळ, शोभाताई खरात, जनार्धन गवई, कंकाळ उपस्थित होते. बुद्धविहार समितीचे सचिव डि.एस.बोर्डे यांनी प्रस्ताविक भाषणातून धम्मगीरी बुद्धविहाराच्या निमिर्तीचा आढावा सादर केला. तर मिलींद बोंदडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन समितीचे अध्यक्ष वा.का.दाभाडे आणि जे.पी.वाकोडे यांनी केले. भंते स्वरानंद यांनी धम्मदेसना देवून बुद्धवंदना घेतली. यावेळी दिलीप कंकाळ यांच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ उपस्थित भिक्खुसंघाला भेट देण्यात आले. तर अमोल हिरोळे यांच्य वतिने भोजनदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे आर.एन.घेवंदे, जे.पी.वाकोडे, आर.के.इंगळे, पी.एम. चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठय़ा संख्येनी उपासक, उपासिका उपस्थित होते. तर सावित्रीबाई फुले नगरातून धम्मरॅली काढण्यात येवून या रॅलीचे काँग्रेस नगर येथे विसर्जन करण्यात आले. नगरसेवीका प्रमिला गवई यांनी त्यांचा मुलगा बुध्दवासी कैलास गवई यांच्या स्मृतीप्रित्यार्थ काँग्रेस नगर येथील कपिलवस्तु बुद्धविहाराला दान दिलेल्या बुद्धमुर्तीची शोभायात्रा काढण्यात आली होती.
बुद्धजंयतीनिमित्त धम्मरॅली
By admin | Updated: May 15, 2014 00:23 IST