शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:38 IST

बुलडाणा : पावसाच्या चुकीच्या नोंदीच्या आधारावर जिल्ह्यात तीव्र, मध्यम दुष्काळाचा घाट घालून शेतकºयांना नागविल्या जाण्याचा प्रकार शासन प्रशासनाच्या माध्यमातून ...

बुलडाणा : पावसाच्या चुकीच्या नोंदीच्या आधारावर जिल्ह्यात तीव्र, मध्यम दुष्काळाचा घाट घालून शेतकºयांना नागविल्या जाण्याचा प्रकार शासन प्रशासनाच्या माध्यमातून करीत आहे. सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या बाबतीत सापत्नपणाची वागणूक सत्ताधाºयांकडून दिली जात आहे. एकीकडे मराठवाड्यात दुष्काळ असताना त्याच्या लगतचा बुलडाणा जिल्हा डावलल्या जातो, असा आरोप करीत संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा येथे केली. संपुर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावा यासह तब्बल २६ मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात आमदार डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, भास्कर मोरे, जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, शांताराम दाणे, राजेंद्र गाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व विविध आघाड्यांचे पदाधिकारी तथा शेतकरी, शेतमजूर या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मध्यम, तीव्र स्वरुपाच्या दुष्काळाचा घाट घालून गावे जलयुक्तमुळे पाणीदार झाल्याचे दावे केल्या जात आहेत. वास्तविक शेतकºयांनी पदरमोड करीत पेरणी केली. पावसाअभावी पिके करपून गेली. रब्बीलाही फटका बसला. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाचे चित्र असताना मोजक्याच तालुक्यांना दुष्काळाच्या कक्षेत घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ज्या काही मोजक्या धरणात पाणी आहे, ते शेतीला न देता या धरणावरील विज तोडून शेतकºयांना त्रास दिल्या जात आहे. ५० टक्यांपेक्षा जास्त शेतकºयांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. ८० टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे भावांतर फरक योजना लागू करुन शेतकºयांच्या खात्यात फरकाची रक्कम टाकावी अशी मागणी त्यांनी केली. विजेचे प्रश्न कायम आहेत. दुष्काळाची मोठी मोठी आहे ते पाहता एकरी २० हजारांची मदत आणि फळबागांसाठी दीड लाख रुपयांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकºयांच्या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरुन शासनाला धडा शिकवेल असेही ते म्हणाले. दरम्यान अधिकाºयांकडून जर शासनास चुकीची माहिती दिल्या जात असेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवू असा इशाराही खासदार प्रतापराव जाधव यांनी दिला. दरम्यान उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. शेतकºयांची भाजप सरकारने दयनीय अवस्था केली असून शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ते म्हणाले. शेतकºयांना दुष्काळी पॅकेजचा लाभ देवून हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, कर्जमाफीसाठी बँकांच्या ओटीएस सवलतीचा लाभ शेतकºयांना द्यावा, नियमित स्वरुपात दहा तास विजपुरवठा करण्यात यावा, एमएसपीप्रमाणे खरेदी केली जावी, सक्तीची विज वसूली थांबवावी, संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह २६ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. जिजामाता क्रीडा संकुलातील खासदार संपर्क कार्यालयापासून शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही - रायमुलकर संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिला. सोबतच दुष्काळाच्या मुद्दयावर अधिवेशनात आवाज उठवून तीव्र आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला. सोबतच नादुरुस्त विज  रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली. 

दुष्काळाच्या मुद्दयावर शेतकºयांत भांडणे लावण्याचा प्रयत्न - खेडेकर शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. मंडळनिहाय दुष्काळ जाहिर करुन मंडळा मंडळातील शेतकºयांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आम्ही सत्तेत असलो तरी सरकारजमा नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेतकºयांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा दिलेला आदेश मानून शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी ही आंदोलनात्मक भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना