शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात भाविकांची मांदियाळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:02 IST

बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात कलशारोहण, श्रीमुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमास २५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे

बुलडाणा : बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात कलशारोहण, श्रीमुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमास २५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. श्रीगोपाल आश्रमात भाविकांची मांदियाळी जमत आहे. पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देवचे अध्यक्ष आचार्य महानुभाव आचार्य लोणारकरबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गोपाल आश्रमात २५  जानेवारीपासून श्री पंचकृष्ण मंदिराचे कलशरोहण, उद्घाटन, श्रीमुर्ती स्थापना, अनुसरण विधी व पंचावतार उपहार कार्यक्रमास सुरूवात झाली आहे. यानिमित्त सव्वा कोटी नामस्मरण यज्ञ, सामूहिक श्रीमद् भगवदगिता ज्ञानयज्ञ सहस्त्र पारायण कार्यक्रम होत आहे. २५ ते २९ जानेवारी दरम्यान दररोज सकाळी धार्मिक कार्यक्रम होतील तर याच सप्ताहामध्ये सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान विविध क्षेत्रातील वक्त्यांची वेगवेगळ्या विषयावर व्याख्याने होत आहेत. २५ ते २८ दरम्यान रात्री संगीतमय अलौकीक संगीतलिला कार्यक्रम झाले. यामध्ये प्रवचनकार  भीष्माचार्यबाबा महानुभाव (नाशीक) यांचे प्रवचन होणार आहे. २९ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० दरम्यान किर्तनकार कळमकरबाबा महानुभाव (औरंगाबाद) यांचे कीर्तन, ३० जानेवारी रोजी पहाटे ३ ते सकाळी ७.३५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत शहरातून  शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ३१ जानेवारीला पहाटे धार्मिक कार्यक्रमासह १२.३० वाजता भोजन-प्रसादाचे वितरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन पंचकृष्ण प्रबोधन परिषदच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा