शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा : काहींचा काठावर विजय, तर काहींची भरघोस  मताने आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:24 IST

देऊळगावराजा: तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण  झाली. दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने प्र त्यक्षात सतरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली.  यामध्ये काही उमेदवारांचा काठावर विजयी झाला तर काही  उमेदवारांनी भरघोस मताने आघाडी मिळवली.

ठळक मुद्देसतरा ग्रामपंचायतींसाठी पार पडली निवडणूकदोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध 

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण  झाली. दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने प्र त्यक्षात सतरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली.  यामध्ये काही उमेदवारांचा काठावर विजयी झाला तर काही  उमेदवारांनी भरघोस मताने आघाडी मिळवली.शनिवारी मतदान झाल्यानंतर एकूण २२ हजार २४८ मतदारांपैकी  १८ हजार २६८ मतदारांनी मतदान केले होते. १७ ग्रामपंचाय तींसाठी एकूण ८२.११ टक्के मतदान झाले होते. सोमवारी तहसील  कार्यालयात सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. ट पालाची मते मोजल्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला  सुरुवात झाली. यावेळेस सरपंचपद हे जनतेतून निवडल्या जाणार  असल्याने प्रचंड उत्सुकता होती.  या टप्प्यात घेण्यात आलेल्या  निवडणुकीमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सिनगाव  जहागीर येथील लढतीकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागून होते.  सरपंच पदाच्या उमेदवार लता प्रकाश गीते यांनी तालुक्यातील  सर्वात मोठी आघाडी घेऊन सुनीता गजानन डोईफोडे यांचा  पराभव करत दणदणीत विजय संपादन केला. एवढेच नव्हे तर  सदस्यांच्या ११ जागांपैकी दहा जागा जिंकत पॅनेलची धुरा  सांभाळणारे प्रकाश गिते व गजानन पवार यांनी राजकीय  कौशल्य सिद्ध करत सिनगाव जहागीरचा गड काबीज केला  आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांच्या पॅनेलच्या  सरपंच पदाचे उमेदवार माधव मार्तंडराव शिंगणे अवघ्या एका म तांनी विजयी झाले. गारगुंडी ग्रामपंचायतमध्ये जिल्हा युवक  काँग्रेसचे सरचिटणीस गजानन दिनकर काकड ६0 मतांची  आघाडी घेऊन सरपंचपदी विजयी झाले. तालुक्यातील १९ ग्राम पंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य याप्रमाणे आहेत.  तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक बाजड,  निवासी ना. तहसीलदार मदन जाधव, ना. तहसीलदार प्रशांत  जाधव, सचिन सावंत, एम.के.पवार, निवडणूक विभाग  यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण  केली. उपविभा. पो.अ. भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली  ठाणेदार सारंग नवलकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तहसील  कार्यालयातील मतमोजणी कक्ष व आवारात तैनात ठेवल्याने शां ततेत निकालाची प्रक्रिया पार पडली.