शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

तोतया वर्गणीदारांना अटक

By admin | Updated: November 14, 2015 02:27 IST

बुलडाणा शहरातील बालाजी संस्थानच्या नावाचा गैरवापर.

बुलडाणा: शहरातील मलकापूर रोडस्थित बालाजी मंदिरावर भंडारा असल्याची बतावणी करून वर्गणी जमा करणार्‍या दोन तोतया वर्गणीदारांना बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथे बालाजी सेवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी पकडून शहर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी दोन्ही तोतया वर्गणीदारांची चौकशी सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय नियमांप्रमाणे तसेच जगजाहीर आणि पारदर्शक उपक्रम राबविणारे म्हणून बालाजी सेवा संस्थानची ओळख आहे; मात्र या संस्थानच्या नावाखाली काही तोतया वर्गणीदार वर्गणी गोळा करीत असल्याचे उघडकीस आले होते. पुन्हा तसाच प्रकार गुरुवारी घडला. बालाजी सेवा समितीकडून मंदिराच्या विकासासाठी देणगी स्वीकारली जाते. त्यापोटी देणगीदारांना नंबर व स्वाक्षरीसह पावती हमखास दिली जाते. असे असताना तालुक्यातील येळगाव येथे दोन जणांनी बालाजी मंदिरावर भंडार्‍यासाठी काही महिलांकडून पैसे घेतले. येळगाव येथील शिवाजी पुतळ्याजवळ अनिल साहेबराव एखनार (वय २५) रा. धामणगाव बढे आणि ईश्‍वर बाबलुराव धुमाळ (वय २0) रा. बोराखेड यांनी महिलांना भंडार्‍यासाठी पैसे मागितले. सदर महिलेने तत्काळ बालाजी सेवा समितीशी संपर्क साधला. त्यावरून समितीचे राजेश पिंगळे, संतोष पाटील, ओम शर्मा, राजू महाजन हे येळगाव येथे पोहोचले. त्यांनी दोन्ही तोतया वर्गणीदारांना पकडून शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले. या दोघांविरोधात तक्रारीची नोंदणी करून बुलडाणा शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.