शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
3
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
4
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
5
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
6
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
7
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
8
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
9
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
10
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?
13
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?
14
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
15
Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका
16
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
17
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
18
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
19
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
20
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी

गावातील दारुचे दुकान हद्दपार करा!

By admin | Updated: May 1, 2017 23:30 IST

धाड- ३०० च्या वर महिलांनी एकत्रित येत आजची ग्रामसभा गाजवली. देशी दारू दुकान गावाच्या हद्दीबाहेर काढण्यासाठी गावातील महिलांनी ठाणेदार पाटील यांना निवेदन दिले

धाड : धाडमध्ये महाराष्ट्रदिनी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावातील साधारण ३०० च्या वर महिलांनी एकत्रित येत आजची ग्रामसभा गाजवली. देशी दारू दुकान गावाच्या हद्दीबाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे आज ग्रामसभेत ठराव पारित करुन गावातील महिलांनी यासंदर्भात एक निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.निवेदनात येत्या १५ दिवसात सदर दारू दुकान गावातून हद्दपार न केल्यास आंदोलनाचा इशाराही याठिकाणी देण्यात आला आहे. त्यासह गावहद्दीत यापुढे कुठल्याही विदेशी वा देशी दारूचे दुकानास परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यावेळी साधारण: ३०० महिलांनी आपला मोर्चा हा पोलीस स्टेशनकडे वळवत येथील ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांनाही निवेदन दिले. निवेदनावर गावातील वंदना अनिल घाडगे, सविता भरत उबाळे, दुर्गा रामेश्वर मोहिते, रीना शेषराव ठाकरे, गीता प्रकाश राऊत, सीमा अनिल कुटे, पूजा शिवाजी गुजर, कविता अरविंद गुजर, निर्मला विष्णू वाघुर्डे, अनसूया सुनील आपार, साबीराबी बागवान यांच्यासह जवळपास २८० महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वत्र राज्यमार्गावरील मद्य विक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाने दारू व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. आता ग्रामीण भागातही गावागावातून असलेली दारूची दुकाने गावाबाहेर हद्दपार करण्यासाठी महिला वर्ग पुढाकार घेत आहे. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी गावागावातून होणाऱ्या ग्रामसभेत उभी बाटली आडवी करण्याचा संकल्प ग्रामीण महिलांनी केल्याने दारूची बाटली हद्दपार होणार काय? हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. देशी दारूचे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मध्यवर्ती भागात सुरू आहे. महामार्गावरील बंद केलेल्या दारूच्या दुकानांप्रमाणे गावाचे मध्यवर्ती भागातील दारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी धाड येथील महिलांनी पुढाकार घेतला.