शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन योजनेची थकबाकी नाकारली

By admin | Updated: March 11, 2016 02:54 IST

सरकार म्हणते परवानगी घेतली नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी केली चर्चेची मागणी.

बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍याचे देय असलेले ४३ कोटी २६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, उर्वरित शेतकर्‍यांनी कृषी विभागाची पूर्वसंमती घेतली नसून, व्यक्तिगत पातळीवर सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था बसवून घेतल्याने त्यांना अनुदान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी धक्कादायक भूमिका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात शासनाने घेतल्याने, या प्रकरणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, विधानसभेत अर्धा-तास चर्चेची मागणी गुरुवारी विधानसभेत रेटून धरली आहे.विदर्भातील शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळावा, याकरिता विदर्भ सिंचन विकास कार्यक्रम शासनाने सुरू केलेला आहे. सदर योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतकर्‍यांनी लाभ घेतला होता. मात्र, त्यापोटी मिळणारे ८७ कोटी ८१ लाख अनुदान अद्यापही शेतकर्‍यांना वितरित करण्यात आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार डॉ. संतोष टारपे यांनी संयुक्तपणे तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हा धक्कादायक खुलास केला आहे.