शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू; सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 12:05 IST

आरोग्य प्रशासनाकडून खामगाव शहरातील सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत असतानाच डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. परिणामी, आरोग्य प्रशासनाकडून खामगाव शहरातील सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे दीड हजार घरांना भेटी देण्यात आल्या.गत पंधरवाड्यात खामगाव शहरात डेंग्यूचे १३ पेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. कोरोना विषाणू संक्रमण कालावधीतच डेंग्यू आणि इतर साथरोगाचे संकट घोंगावू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. खामगाव शहराच्या विविध भागात आढळून आलेल्या रूग्णांच्या परिसरातील सहा हजार १७५ जणांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. कोविड-१९ च्या अनुषंगाने यावेळी आवश्यक त्या उपाययोजनाही आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या. दरम्यान, कोरोना कालावधीतच सर्दी, ताप, खोकला या आजाराची रूग्णसंख्या वाढीस लागली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून वातावरणातील बदलामुळेही विविध व्हायरल आजाराच्या संख्येत वाढ होत आहे. यातच शहरातील विविध प्रभागात असलेले घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी युक्त परिसरामुळे डेंग्यू आणि मलेरीयासारखे आजार डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक बी.बी.बढे, आशा वर्कर आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे सर्वेक्षण पूर्ण केले.

पाच पथकांकडून सर्वेक्षण!डेंग्यू सोबतच साथरोग नियंत्रणासाठी खामगाव शहरात पाच पथकांकडून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आशा वर्कर, आरोग्य सेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ७ ते ९ सप्टेंबर या कालावधीत गृहभेटी देण्यात आल्या. यावेळी १२४ दूषित घरे शोधण्यात आली. यामध्ये ४१३० भांड्याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ३६५ दूषीत भांडी आढळली असून २८८ भांडी खाली करण्यात आली. तर ७७ भांड्यांमध्ये टेमिफास्ट द्रावण टाकण्यात आले.

 

टॅग्स :khamgaonखामगावdengueडेंग्यू