शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यू पसारताेय पाय; यंत्रणा अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 11:10 IST

Dengue spreading in Buldana district : जानेवारी ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण आढळले, तर १४७ रुग्ण हे संशयित आहेत.

- भगवान वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याची स्थिती असून, चिखली तालुक्यात डेंग्यूचे सात रुग्ण आहेत, तर संपूर्ण जिल्हाभर तब्बल १४७ डेंग्यूचे संशयित रुग्ण असून, हिवतापाचे मात्र दोनच रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रोखण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आहे. शहरासह जिल्ह्यात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने डेंग्यूचा प्रकोप वाढत चालला आहे. जानेवारी ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण आढळले, तर १४७ रुग्ण हे संशयित आहेत. एकट्या चिखली तालुक्यातील अमडापूरमध्ये सात रुग्ण आढळल्याने तिथे उद्रेक जाहीर करण्यात आला होता. मात्र, आवश्यक त्या उपाययोजना करून डेंग्यूचा वाढता प्रकोप रोखण्यास जिल्हा हिवताप कार्यालयाला यश आले आहे. शहरात डासांची तीव्रता कमी झाली असली, तरी ग्रामीण भागात अद्यापही डेंग्यूच्या डासांचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूने जिल्ह्यातील नागरिक त्रस्त असतानाच चालू वर्षात पावसाळ्यातच डेंग्यूचा प्रभाव वाढला आहे. सध्या पारेशन कालखंड सुरू असून, यादरम्यान जिल्ह्यात हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्या डासांमुळे  होतो डेंग्यू?डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे, एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. एका संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर व्यक्तीला हा आजार होतो.फक्त चिखली तालुक्यातच आढळले डेंग्यूचे रुग्णजिल्ह्यातील केवळ चिखली तालुक्यातील अमडापूरमध्येच डेंग्यूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. एकावेळी एवढे रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा हिवताप कार्यालयाने उद्रेक जाहीर केला होता. या रुग्णांवर योग्य ते उपचार करून हा उद्रेक रोखण्यात आला आहे. 

जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जरी आढळले असले, तरी आता जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणात आहे. १४७ रुग्ण संशयित असून, त्यांच्या निश्चितीकरणाचे अहवाल प्राप्त होताच, त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करून डेंग्यू नियंत्रणात आणण्यात येईल. -एस.बी. चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :dengueडेंग्यूbuldhanaबुलडाणा