शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

दारूविक्री बंद करण्याची मागणी करणाऱ्याकडेच सापडला दारू साठा!

By admin | Updated: July 10, 2017 00:58 IST

पोलिसांची धडक कारवाई : शिवसेना नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: शहरातील अवैध धंदे त्यातही प्रामुख्याने अवैधरीत्या वाढलेली देशी-विदेशी दारू विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी निवेदनातून स्थानिक पोलीस प्रशासनाला दिला; मात्र ठाणेदार सारंग नवलकर यांनी यासंदर्भात दखल घेऊन कर्मचाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत निवेदन देणारे शिवसेना नगरसेवक अजय शिवरकरसह एका विक्रेत्याकडे अवैध दारूचा साठा मिळून आल्याचा प्रकार घडला.दारूची अवैधरीत्या विक्रीही गुप्तपणे मोठ्या प्रमाणात देऊळगावराजा शहरात वाढली. यामुळे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, न.प. उपाध्यक्ष पवन झोरे, नगरसेवक विजय देवउपाध्ये, वसंताआप्पा खुळे, मोरेश्वर मिनासे, शिवाजी कुहीरे, राजू नागरे, मोहन खांडेभराड, नगरसेवक नंदन खेडेकर, नगरसेवक अजय शिवरकर, नगरसेविका रेखा बोरकर, नंदा कटारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाणेदार नवलकर यांना निवेदन देऊन अवैध दारूविक्री तत्काळ बंद करावी अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. दरम्यान, ठाणेदार नवलकर यांनी सदर निवेदनाची दखल घेत तपास सुरू केला. पीएसआय अकील काझी, पीएसआय गौरव सराग, हेड कॉ. सर्जेराव तौर, जगदीश वाघ, पो.कॉ. संजय घिके, भराड, जाधव व कर्मचारी सज्ज झाले. अवैधरीत्या जमवलेला दारूचा साठ्याची माहिती पोलिसांकडे होती. जालना रोडवर असलेल्या बारजवळ पोलिसांचा ताफा आला. कुलूप तोडले असता आतमध्ये ६७२ देशी दारूच्या बाटल्या व तो माल चक्क नगरसेवक अजय शिवरकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. बाजूच्या गल्लीत दुसऱ्या पथकाने छापा टाकला असता भाऊराव खुपसे यांच्या घराजवळून ९६ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. देऊळगावराजा पोलिसांनी अवैधरीत्या दारूसाठा व विक्रीप्रकरणी शिवसेना नगरसेवक अजय अंबादास शिवरकर, भाऊराव नारायण खुपसे यांच्याविरुद्ध पीएसआय गौरव सरागे, हे.कॉ. सर्जेराव तौर यांच्या फिर्यादीवरून मुंबई दारूबंदी कायद्यानुसार दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन १९८/१७, १९९/१७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.शिवसेनेची झाली फसगतएका चांगल्या उदात्त हेतूने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, नगरसेवक नंदन खेडेकर, नगरसेविका रेखा बोरकर, नंदा कटारे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ठाणेदार नवलकरांना निवेदन दिले. शिवसेनेचे नगरसेवक अजय शिवरकरसुद्धा तिथे हजर होते. पोलिसांनी तातडीची पाऊले उचलून धाडी टाकल्या आणि त्या धाडीत ६७२ देशी दारूच्या बाटल्या सापडल्याने निवेदन देताना हजर असणारे नगरसेवक अजय शिवरकर यांच्यावर पुढच्या दोन तासानंतर पो.स्टे.ला आरोपी म्हणून हजर होण्याची वेळ आल्याने शिवसेनेची यात मोठी फसगत झाली. या प्रकारामुळे शहरभर चर्चेचे पेव फुटले आहे.