शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अमडापूर ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:15 IST

गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देगावातील विकासकामे थंडबस्त्यात लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं.ला शासन स्तरावरून गावातील विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगामार्फत लाखो रूपयांचा निधी देण्यात आला आहे. परंतु, गावातील विकासकामारीता  या निधीच्या विनियोगात ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाने गलथान कारभार केल्याने गावातील विकासकामे थंडबस्त्यात पडली आहे. प्रकरणी गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामसभेला शासनाने विशेष अधिकार दिलेले असताना ग्रामसभेत व मासीक सभेत विकासाचे अनेक ठराव घेवून सुध्दा पदाधिकारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे विकासाचे तिनतेरा वाजले आहेत. आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत अमडापूर ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारा निधी योग्य नियोजन करण्यासाठी ५ वर्षाचा कृती आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक वार्डातील समस्या लक्षात घेवून तो तयार करीत मंजूर करून घेतला आहे. त्यावर केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामविकास निधी सरपंच व सचिव यांच्या खात्यात १४ व्या वित्त आयोगातून आलेले १ कोटी ४ लाख ९९ हजार २२९ रूपये जमा आहेत. गावातील स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. वार्ड नं.५ मध्ये मेन रोडचे काम झालेले नाही, नाल्यासफाई नाही, क्रीडा मैदान नाही, अनेक भागामध्ये जाणेयेणेसाठी रस्ते नाही. अशा समस्या उद्भवलेल्या असतानासुध्दा १४ व्या वित्त आयोगाचा खात्यामध्ये कोट्यावधी रूपये जमा आहेत. सरपंच व सचिव यांनी कोणतेची कामे  केली नसल्याने गावाचा विकास खुटंला असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. प्रकरणी त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी लोकशाहीदिनी आपल्या सहीनिशी दिली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत