शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातृतिर्थात; सिंदखेड राजातून आप '२०१९' बिगुल फुंकणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:41 IST

बुलडाणा : आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा  येथे येत असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षिने महाराष्ट्रामध्ये २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांचा बिगुल फुंकणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे लक्ष्मण कोल्हे यांनी दिली.पत्रकार भवनाच्या सभागृहात ...

ठळक मुद्देपत्रकार भवनाच्या सभागृहात आज २७ डिसेंबर रोजी आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली.मॉ जिजाऊंच्या जन्मस्थळावरुन २०१९ मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीचा बिगुलही फुंकण्यात येणार. वेगवेगळ्या आघाड्यांवर निवडणुका लढविण्याची आम आदमी पार्टीची तयारी आहे.

बुलडाणा : आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा  येथे येत असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षिने महाराष्ट्रामध्ये २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांचा बिगुल फुंकणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे लक्ष्मण कोल्हे यांनी दिली.पत्रकार भवनाच्या सभागृहात आज २७ डिसेंबर रोजी आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. नितिन नांदुरकर, सुनिल मोरे, अकोला निरिक्षक प्रशांत मोरे, कमांडर अलिम पटेल, वानखेडे, तालुका संयोजक विष्णु दांडगे, प्रसाद घेवंदे, इरफान शेख, ज्ञानेश्वर पाटील, मुकुंद चोपडे, संजय जैन, गजानन धांडे, भानुदास पवार, अंबादास माळी, भालेराव, अ‍ॅड. मापारी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, आमच्या पक्षाने दिल्लीच्या शैक्षणिक, वैद्यकीय कामात दोनच वर्षात विलक्षण प्रगती करुन सामान्य मानसांच्या मनात जागा निर्माण केली आहे. पक्षाचे पुढील लक्ष महाराष्ट्र असून विविध अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर निवडणुका लढविण्याची आमची तयारी आहे. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारीला मातृतिर्थ सिंदखेड राजात येत आहे. त्यांच्या आगमनामुळे कार्यकर्ते नव्हे तर सामान्य माणसामध्येही नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असून मॉ जिजाऊंच्या जन्मस्थळावरुन २०१९ मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीचा बिगुलही फुंकण्यात येणार असल्याचे सांगत सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही कोल्हे यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल