समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्ही. टी. देशमुख हे होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी केले. यावेळी कोविड १९ च्या नियमांचे पालन करून कला शाखेच्या १४, वाणिज्य शाखेच्या ०६ व विज्ञान शाखेच्या ३० असे एकूण ५० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व वृक्षरोपे देऊन गौरव करण्यात आला. समन्वयक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ प्रवीण ठेंग हे होते. संचालन मराठी विभागप्रमुख प्रा. नंदा मास्कर यांनी केले व आभार वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील मामलकर यांनी मानले. या समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नागेश गट्टूवार, डॉ अभय ठाकूर, प्रा. शुभम साखरे, डॉ. अरुण गवारे, प्रा. भास्करराव भिसे, प्रा. पुरुषोत्तम चाटे, प्रा. पराग ब्राह्मणकर, डॉ. राहुल उके, प्रा. अमोल बढे व प्रा. हिरनवाळे, प्रा. दादा मनगटे, प्रा. नीलेश रहाटे, प्रा. प्रतीक गायकी, प्रा. डॉ. सुप्रिया बेहरे, डॉ. चित्रा मोरे, प्रा. रामेश्वर बनकर, सिराळ, कुयटे, खाडे, धुरंधर व सोनुने यांनी प्रयत्न केले.
श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST