शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी घातला खुर्चीला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:48 IST

मलकापूर नगर परिषद प्रशासनातील  अधिकारी नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना  आपल्या कामासाठी नगरपालिकेत वेळोवेळी चकरा  माराव्या लागत आहे. ही बाब नागरिकांनी शिवसेना शहर  प्रमुख किशोर नवले यांच्या कानावर घातली असता  त्यांनी व शिवसैनिकांनी ६ सप्टेंबर रोजी बांधकाम विभाग  नगर अभियंता यांचे कार्यालय गाठले असता तेथे ते हजर  नव्हते. त्यामुळे रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी  करण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासनातील अधिकारी नेहमी राहतात गैरहजर नागरिकांना मारावे लागतात हेलपाटेनगर अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: मलकापूर नगर परिषद प्रशासनातील  अधिकारी नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना  आपल्या कामासाठी नगरपालिकेत वेळोवेळी चकरा  माराव्या लागत आहे. ही बाब नागरिकांनी शिवसेना शहर  प्रमुख किशोर नवले यांच्या कानावर घातली असता  त्यांनी व शिवसैनिकांनी ६ सप्टेंबर रोजी बांधकाम विभाग  नगर अभियंता यांचे कार्यालय गाठले असता तेथे ते हजर  नव्हते. त्यामुळे रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी  करण्यात आली.मलकापूर नगर परिषद प्रशासनातील अधिकारी हे आ पल्या कामकाजाच्या वेळी गैरहजर राहतात. त्याचप्रमाणे  महिन्यातून बरेच दिवस सुटीचा अर्जही न टाकता  कार्यालयातून गायब राहतात. त्याचप्रमाणे काही  अधिकारी हे सकाळी मस्टरवर सही मारून निघून जाता त. त्यामुळे आपली कामे करण्यासाठी नगर पालिकेत   आलेल्या नागरिकांना त्यांची भेट घ्यावयाची असल्यास  ते भेटतच नाही. एकीकडे नगरपालिका प्रशासन  नागरिकांना कर भरावयाची सक्ती करत आहे तर  दुसरीकडे नागरिक आपले कर भरावयास गेले असता  त्या ठिकाणी कर्मचारी असो वा अधिकारी हे उपस्थित  नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे.  त्यामुळे अशावेळी नगर परिषदेकडील असलेली कामे  नागरिकांनी करावी तरी कशी, असा प्रश्न नागरिकांना  पडला आहे. या सर्व बाबीला कंटाळून नगर परिषद  प्रशासनाकडून नागरिकांची कामे होत नसल्याने  नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले  यांच्याकडे आपली कैफीयत मांडली असता ते नगर  परिषद बांधकाम विभागाचे नगर अभियंता नंदकिशोर  येवतकर यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र तेसुद्धा  कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी  त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त  केला. यावेळी मुकेश लालवाणी, राजेश फुलोरकर,  उमेश हिरुळकर, गोपीचंद वाधवाणी यासह नागरिक व  शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.