शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

किनगाव जट्टू येथे तीव्र पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:54 IST

किनगाव जट्टू : यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्याकरीता पायपीट करावी लागत असल्याने त्वरीत उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.येथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची भूजल पातळी झपाट्याने खोल गेली. ...

ठळक मुद्देयेथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता.विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती योजना बंद पडली असल्याने त्या विहिरीतून ग्रामस्थांना उन्हात पाणी काढावे लागत आहे. २५० रुपये खर्च करुन एक हजार लिटर पाणी विकत घेतात.

किनगाव जट्टू : यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्याकरीता पायपीट करावी लागत असल्याने त्वरीत उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.येथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची भूजल पातळी झपाट्याने खोल गेली. त्यामुळे आवठड्यातून एक दिवस पाणी येते ते सुद्धा नेहमी अर्ध्या भागात ते सुद्धा पुरेसे नसते. नदीतील पूरक पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती योजना बंद पडली असल्याने त्या विहिरीतून ग्रामस्थांना उन्हात पाणी काढावे लागत आहे. रस्ता चढउताराचा असल्याने महिलांना डोक्यावर पाणी भरणे अवघड झाले आहे. काही हातपंप पाण्याअभावी शोभेचे ठरत आहेत. गावातील अर्ध्या भागातील नागरिकांना नेहमी नदीकाठावरील हातपंपाचे पाणी पिण्यासाठी आणावे लागते. परंतु त्याचे पाणीसुद्धा कमी झाल्याने रात्रंदिवस जागरण करुन थांबून पाणी हापसावे लागत आहे. मारोती मंदिराजवळील विहीर कोरडी पडली आहे. येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने काही नागरिक गाडीबैलावर ड्रम टाकून शेतातून पाणी आणतात. तर काही मोटारसायकलला कॅन लावून तर गोरगरीब जनतेला मिळेल तेथून विहिरीतून डोक्यावर पाणी आणावे लागते. काही २५० रुपये खर्च करुन एक हजार लिटर पाणी विकत घेतात. परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दोन महिन्यापूर्वी नदीनाले कोरडे पडले. त्यामुळे जी पाणीटंचाई एप्रिल-मे महिन्यात निर्माण होणार होती ती मार्च महिन्याच्या पुर्वसंध्याला निर्माण झाली आहे. चोरपांग्रा धरणाजवळील जुनी नळ योजना सुद्धा नियोजनाअभावी जवळपाास १० ते १५ वर्षापासून बंद पडली आहे. थोड्याफार प्रमाणात तात्पुरती पाणीटंचाई दूर करण्यासाठी नदीतील विहिरीतील पाणी मारोती मंदिराजवळील विहिरीत सोडून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्याच विहिरीत आडवे बोअर घ्यावे व पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामपंचायत जवळील बोरवेलजवळ सिमेंटची टाकी बांधून तोट्या लावून पाणीवाटप केल्यास व शांतीलाल सोनी यांचे घराजवळील विहीर पाणी सोडल्यास पाणीटंचाई दूर करण्यास मदत होईल अशी मागणी होत आहे. किनगाव जट्टू येथे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहण प्रस्ताव पाठविला असून पूरक पाणी पुरवठ्याच्या विहिरीतील पाणी मारोती मंदीराजवळील विहिरीत लवकरच सोडण्यात येवून पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामपंचायत जवळील बोरवेलजवळ सिमेंट टाकी बांधून तोट्या लावण्यात येतील.- ए.के.नवले, ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. किनगाव जट्टू, ता.लोणार.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार