शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वनिधीतून उपेक्षीतांसाठी इमारत बांधणारा सेवा समर्पीत शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:24 IST

स्वत:च्या नोकरीतून मिळणाऱ्या अर्थार्जनातून वंचीतांप्रती कृतीशील गहिवर प्रकट २६ विद्यार्थ्यांच्या पालकतची जबाबदारी सांभाळत आहेत.

- ओमप्रकाश देवकर लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उपेक्षित व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वनिधीतून हक्काची इमारत बांधून २६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी गेल्या ११ वर्षापासून सातत्याने धडपडणारे अनंत दामोदर शेळके हे व्यक्तीमत्व. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे त्यांचे हे कार्य सुरू आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहे. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय स्वत:च्या नोकरीतून मिळणाऱ्या अर्थार्जनातून वंचीतांप्रती कृतीशील गहिवर प्रकट २६ विद्यार्थ्यांच्या पालकतची जबाबदारी सांभाळत आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी स्व निधीतून सुसज्ज इमारत त्यांनी उभी केली आहे. त्यांना भोजन, निवास, शिक्षणासह सर्व सुविधा ते मोफत पुरवीत आहे.स्वामी विवेकानंद व प.पू.शुकदास महाराजांच्या विचारांना आदर्श मानून त्याला कृतीतरुप देण्याचं काम अनंत शेळके नित्यानंद सेवाप्रकल्पाच्या माध्यमातून करत आहे.बेघर, अनाथ, एकल अनाथ, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील या मुलांचे ते संगोपन करत आहेत. आतापर्यंत ३९ विद्यार्थी शासकीय, निमशासकीय सेवेत गेले आहेत. आता हेच विद्यार्थीही मदत करत आहेत. चिखली-मेहकर मार्गावर तीन हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेल्या हक्काच्या या पक्क्या घरात हे विद्यार्थी राहतात. मदती अभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया विद्यार्थ्यांसाठी शेळकेंनी हे हक्काच घर उपलब्ध केल आहे. माजी विद्यार्थी राजेश निकस, नीलेश निकस, चेतन जाधव, सुशील मालवी, ओम निकस, सदानंद शेळके, विशाल पवार, शुभम अवचार, नंदू भोंबे यांचे त्यांना सहकार्य मिळत आहे. जि. प. चे शिक्षकही धान्य, वस्तूंची मदत करतात. उपशिक्षणाधिकारी पागोरे हे ही त्यांना मदत करत आहेत.

अडचणीमुळे शिक्षणापासून कोणी वंचीत राहू नये, अनाथ, एकल अनाथांसह निराधारांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणूण त्यांना मदत करण्याची कल्पना सुचली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपक्रम सुरू केला. अनेकांचे सहकार्य मिळाले.-अनंत शेळके,- शिक्षक, हिवरा आश्रम

एका विद्यार्थ्यांला दत्तक घेण्यापासून सुरू झालेला प्रकल्प आज २६ विद्यार्थ्यांना आधार देत आहे. कारण मुले ही ईश्वराची अवतार असून त्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. ही सेवा अखंड रहावी यासाठी हा सेवायज्ञ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू. -अर्चना शेळके- पत्नी

टॅग्स :buldhanaबुलडाणा