शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्येत घट; कोविड केअर सेंटर पडले ओस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:14 IST

खामगाव येथील दोन शासकीय कोविड केअर सेंटरसोबतच खासगी कोविड सेंटरही ओस पडले आहेत.

ठळक मुद्देखामगाव-पिंपळगाव रस्त्यावर दोन कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. कोविड रुग्णालयात गुरुवारपर्यंत ३४ रुग्ण उपचार घेत आहेत. 

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : खामगाव आणि परिसरात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, खामगाव येथील कोविड केअर सेंटर ओस पडलेत. तथापि, दिवाळीनंतर घाटाखालील विविध तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ होत आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयात गुरुवारपर्यंत ३४ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच, खामगाव येथे खामगाव-पिंपळगाव रस्त्यावर दोन कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. गत तीन महिन्यांपूर्वी कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र म्हणून बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहराची नोंद होत होती. त्यामुळे काही खासगी कोविड केअर सेंटरचीही खामगाव येथे स्थापना झाली. दरम्यान, गत काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे खामगाव येथील दोन शासकीय कोविड केअर सेंटरसोबतच खासगी कोविड सेंटरही ओस पडले आहेत. आता मात्र खामगाव येथील उप-जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या कोविड रुग्णालयात सध्या खामगाव, जळगाव जामोद, नांदूरा परिसरातील  ३४ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

२०० रुग्णांची क्षमताखामगाव येथील शासकीय मुलींच्या आणि मुलांच्या वसतिगृहात तब्बल २०० रुग्ण क्षमता असलेले कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. यामध्ये मुलींच्या वसतिगृहात १५० तर मुलांच्या वसतिगृहात ५० रुग्ण क्षमता असलेले बेड सुसज्ज होते. तर शेगाव रोडवरील एका हॉटेलात आणि सूर्योदय प्रत्येकी एक असे खासगी कोविड सेंटरही खामगावात कार्यान्वित होते.

बंद करण्यासाठी       वेट अ‍ॅण्ड वॉच! दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खामगाव शहरातील शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्यासंदर्भात आरोग्य विभाग ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या