शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कर्जापायी ‘त्या’ युवकाने गोळी झाडून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

मेहकरमधील शाळा क्रमांक - ६ च्या परिसरात अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. ...

मेहकरमधील शाळा क्रमांक - ६ च्या परिसरात अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यावरून तपासाची चक्रे फिरविली तेव्हा अर्पण ऊर्फ सोनू याने स्वत:वर गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांना मृत आरोपी व त्याचे सहकारी यांनी प्रारंभी शहर परिसरातील हरण टेकडीवर पिस्तुलातून फायर करून बघितल्याचेही समोर आले आहे. प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मधुकरराव मोकळे ऊर्फ चिक्कू (३५, रा. पवनसुतनगर), लखनसिंग सरदारसिंग बावरी (२७, रा. अण्णाभाऊ साठेनगर), कृष्णा विजय लहाने (२४, वर्ष रा. शिवाजीनगर), भुवन मंगलसिंग ठाकूर ऊर्फ बंटी (२०, रा. एकतानगर), गोविंद सतीश हेडा (२२), मंगेश गजानन देशमुख (२३, रा. रामनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मृत अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याच्याविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनूच्या मृत्यूप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-- काय आहे प्रकरण--

मेहकर येथील मोहित मधुकरराव मोकळे याने लखनसिंग सरदारसिंग बावरी याच्याकडून अवैधरीत्या गावठी पिस्तूल घेतले होते. मृत अर्पण दिनेश मोकळे हा मोहित मोकळे याचा पुतण्या होता. त्याने हे पिस्तूल सोबत घेत मित्र कृष्णा विजय लहाने, भुवन मंगलसिंग ठाकूर ऊर्फ बंटी, गोविंद सतीश हेडा व मंगेश गजानन देशमुख यांच्यासमवेत जात हरण टेकडी परिसर गाठले. तेथे गोविंद सतीश हेडा याने गुरुवारीच या पिस्तूलमधून एक फायर केले. या घटनाक्रमानंतर अर्पण मोकळे याने शाळा क्रमांक-६च्या परिसरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कर्जापायी त्याने ही आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांनी तक्रार दिली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये हे करीत आहेत.