शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना १८ ऑक्टोबरपासून मिळणार कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:59 IST

बुलडाणा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी  सन्मान योजनेंतर्गत १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम  बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनाकर्जमाफीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी  सन्मान योजनेंतर्गत १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम  बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान  या योजनेंतर्गत दीड  लाख रुपयांपर्यंत कर्ज पूर्णपणे तर दीड लाखावरील कर्ज  एकरकमी पद्धतीने मिळणार आहे. यामध्ये शेतकर्‍यांकडून  ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, अर्जांची छाननी व लेखा परीक्षण  पूर्ण करण्यात आले. ऑडिट केलेल्या अर्जांच्या फाईली  शासनाकडे सादर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा राज्यात  आघाडीवर आहे. राज्यात १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची र क्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.  यामध्ये दीड लाखापर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना थेट  मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे कर्ज बेबाक प्रमाणपत्र दिले जाणार  आहे. जिल्ह्यात मुदतीपर्यंत कर्जमाफीचे ऑनलाइन ४ लाख ६७  हजार ४७५ शेतकर्‍यांनी नोंदणी करण्यात आली.   कुटुंब व्या ख्येत २ लाख ५0 हजार ७४५ कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहे.  त्यानुसार दीड लक्ष रुपयांपर्यंत कर्ज माफ झालेल्या प्रत्येक  तालुक्यातील शेतकर्‍यांना प्रतिनिधीक स्वरूपात कर्ज बेबाक  प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय  आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत  होणार असून, या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण १८ ऑक्टोबर रोजी  दुपारी १२ वाजता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी  कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय  कार्यक्रम १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.  यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक  स्वरूपात शेतकरी कुटुंबाचा सन्मान करण्यात येणार असून, मु ख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार  आहे. तसेच मुंबईत प्रत्येक जिल्ह्यातील दोन शेतकरी कुटुंबाना  आमंत्रित करून मुख्य कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार  आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी