जांभोरा (जि. बुलडाणा), दि. २६ : येथील कर्जबाजारी शेतकर्याने १२ ऑगस्ट रोजी विष प्राशन केल्याने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणत्योत मालवली. जांभोरा येथील जुलाल पुंजाराम खरात (वय ४५) यांच्याकडे दीड ते दोन एकर शेती आहे. त्यांनी जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा जांभोराकडून पंचवीस हजार ते तीस हजार रुपये कर्ज घेतले, तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर ग्रामीणकुटा बँकेचे १५ हजार रुपये कर्ज घेतले. १२ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. त्यांना औरंगाबाद जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची प्राणज्योत मावळली.
विष प्राशन केलेल्या शेतक-यांचा मृत्यू
By admin | Updated: August 27, 2016 03:00 IST