पिंपळगाव सैलानी (बुलडाणा) : बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट धरणात अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले. याप्रकरणी रायपूर पो.स्टे.चे ठाणेदार भूषण गावंडे यांनी घटनास् थळाला भेट दिली व त्या महिलेचे प्रेत धरणातून काढून ए.एस.आय. चंदू राठोड, उल्हास अढाव यांनी त्या प्रेताचा पंचनामा केला असता सदर महिला ही दोन दिवसांपूर्वी धरणात पडलेली असावी, असा पोलिसांचा अंदाज असून, महिलेचे अंदाजे वय ६0 वर्ष आहे. अंगात लाल पातळ, गुलाबी रंगाचे ब्लाऊज, रंग सावळा. सदर प्रेत बुलडाणा सामान्य रुग्णालयात शीतगृहात ठेवण्यात आले असून, रायपूर पोलिस तपास करीत आहे.
पळसखेड भट धरणात अनोळखी महिलेचा मृत्यू
By admin | Updated: November 6, 2014 23:23 IST