शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शारा येथील कोरोना संदिग्ध महिला रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:47 IST

लोणार तालुक्यातील एका ६० वर्षी संदिग्ध महिला रुग्णाचा लोणार ग्रामीण रुग्णालयात २६ मे रोजी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शारा (जि. बुलडाणा): लोणार तालुक्यातील एका ६० वर्षी संदिग्ध महिला रुग्णाचा लोणार ग्रामीण रुग्णालयात २६ मे रोजी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मृत महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.मृत महिलेचा मृतदेह सध्या लोणार ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुसरीकडे  आरोग्य विभागाच्या वतीने या संदिग्ध मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरू करण्यात आले आहे. २६ मे रोजी सायंकाळ पर्यंत या सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना बुलडणा येथील आयसोलेशन कक्षामध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.मृत महिलेचा जावाई हा मुंबई मंत्रालयामध्ये कार्यरत आहे. २० मे रोजी ही महिला, तिची मुलगी व लहान बाळ, जावाई हे मुंबई येथून शारा गावी पोहोचले होते. त्यामुळे त्यांना घरातच क्वारंटीन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र २२ ते २३ मे दरम्यान वृद्ध ६० वर्षीय महिलेला सर्दी, ताप, खोकला व घसा कोरडा पडण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे महिलेस रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून परत घरी आणण्यात आले होते. दरम्यान महिलेचा त्रास वाढल्याने एका खासगी डॉक्टरलाही या वृद्ध महिलेला दाखविण्यात आले होते. तिची एकंदरीत परिस्थिती पाहता खासगी डॉक्टरांनी या वृद्ध महिलेला त्वरित लोणार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती आहे. त्यामुळे लोणार येथे या आजारी वृद्ध महिलेला नेले असता तिचा २६ मे रोजी पहाटे मृत्यू झाला, अशी पुष्टी लोणार येथील आरोग्य विभागातील सुत्रांनी केली.दरम्यान, मृत महिलेचा पतीही आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आता आरोग्य विभाग कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया पारपाडत आहे.

वैद्यकीय संकेतानुसार मृतदेहाचे अंत्यसंस्कारमृत महिला ही कोरोना संदिग्ध रुग्ण म्हणून गणल्या गेली आहे. त्यामुळे मृत महिलेच्या पार्थिवावर वैद्यकीय संकेतानुसारच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यासंदर्भातील प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुसरीकडे तहसिलदार सैफन नदाफ आणि नायब तहसिलदार हेमंत पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी, पोलिस पाटील, गावचे सरपंच यांनीही शारा गावास भेट देवून पाहणी केली तसेच आवश्यक सर्व सुचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या