दिवठाणा (जि. बुलडाणा): चिखलीवरून दिवठाणाकडे येत असलेल्या अँपेला विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव इंडिका गाडीने जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. हा अपघात खामगाव मार्गावरील बोरगाव वसूनजीक २९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला.चिखलीवरून दिवठाण्याकडे प्रवासी घेऊन येणारा एमएच २८ एच ५७५२ क्रमांकाचा अँपे खामगाव मार्गावरील बोरगाव वसू गावाजवळ विरुद्ध दिशेने येणार्या एमएच ३0 एएफ ८६८५ क्रमांकाच्या इंडिका गाडीने अँपेला जोरदार धडक दिली. यात मंगेश गजानन मोरे (१६) या विद्यार्थ्यांंचा जागीच मृत्यू झाला. तर गंगाबाई त्र्यंबक इंगळे (२५), गोदावरी अंबादास मोरे (४२) आणि अँपेचालक विठ्ठल आत्माराम मोरे हे तिघे जखमी झाले. मृत विद्यार्थी मंगेश मोरे हा महाराणा प्रताप विद्यालय, चिखली येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. या अपघातात गंगाबाई इंगळे गंभीर जखमी झाल्या असून, त्या गर्भवती आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यात दाखल करण्यात आले आहे. तर इतर दोघांना बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. चिखली पोलिसांनी इंडिका वाहनाला ताब्यात घेतले आहे.
अँपे अपघातात विद्यार्थ्यांंचा मृत्यू
By admin | Updated: December 30, 2015 01:50 IST