शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:16 IST

मित्रांसमवेत पार्टी करून परत असलेल्या एका नवविवाहित तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली.

खामगाव :  मित्रांसमवेत पार्टी करून परत असलेल्या एका नवविवाहित तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली. दरम्यान, नवविवाहित तरुणाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना पत्र दिले आहे.खामगाव तालुक्यातील नांद्री येथील सुधीर अजाबसिंह इंगळे (२६) हा  युवक पंचायत समिती जवळ सायबर कॅफे चालवायचा. बुधवारी त्याचा  मित्र  महादेव मेतकर याचा वाढदिवस होता.  नांदुरा रोडवरील एका शेतातील पार्टी संपवून तो एम एच-२८-१६११ या क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे परतत असताना, नांदुरा रोडवरील एका पुलावरून मोटारसायकल खाली कोसळली. यात सुधीर गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर त्याच्या पाठीमागे बसलेला छंगांनी नामक मित्र किरकोळ जखमी झाला. या दुर्देवी घटनेमुळे नांद्रा येथील इंगळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी सुधीरच्या पाठीमागे बसलेल्या छंगाणीसोबतच काही मित्रांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.नातेवाईकांना घातपाताचा संशय!सुधीर इंगळे याच्या मृत्यूप्रकरणी घटनास्थळाचे निरिक्षण केल्यानंतर त्याचा भाऊ विलाससिंह रामसिंह इंगळे रा. काळेगाव आणि मावसभाऊ विक्रांत रणवीरसिंह पवार यांनी पोलिस अधीक्षक, पोलिस निरिक्षक पत्र देत घातपाताचा संशयव्यक्त केला आहे.  मृतक सुधीरचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे. सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी केली. यापत्रात मृतक सुधीरच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत.