बोरखेड (जि. बुलडाणा) : शेतात भुईमुगाचे कुटार वाहनात टाकत असताना एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास बोरखेड गावाजवळील शेतात घडली. दानापूर येथील एका शेतकर्याने भुईमुगाचे कुटार भरण्यासाठी गावातील टाटा-४0७ वाहनासह ५ ते ६ मजूर घेऊन सकाळी शेतात दाखल झाले होते. वाहनात कुटार फेकत असताना शांताराम खोडे (वय ४५) रा.दानापूर ता. तेल्हारा या मजुराच्या श्वसननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
कुटार वाहनात टाकत असताना मजुराचा मृत्यू
By admin | Updated: May 20, 2016 01:53 IST