शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला, देऊळगाव साकरशा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 12:28 IST

Buldhana News: नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेला एक युवक पुरात वाहून गेला.ही घटना १७ सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे घडली. वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला असून मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

बुलढाणा: नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेला एक युवक पुरात वाहून गेला.ही घटना १७ सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे घडली. वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला असून मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

देऊळगाव साखरशा येथील मासेमारीचा व्यवसाय करणारा सुनील रामदास कुकडे(३५) शनिवारी दुपारी तीन वाजता लेंडी नदीपात्रात मासेमारीसाठी गेला असताना त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला.याच दरम्यान नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने तो त्यामध्ये वाहून गेला.ही माहिती ग्रामस्थ आणि कुटुंबीयांना रात्री नऊ वाजता मिळाल्यानंतर त्यांनी नदीपत्रात जाऊन कुकडे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार आणि पडणारा पाऊस यामुळे शोध कार्यात अडचणी येत होत्या.त्यामुळे रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ग्रामस्थ आणि कुटुंबीयांकडून त्या युवकाचा शोध घेतल्या जात होता. सकाळी १० वाजता त्या युवकाचा मृतदेह उतावळी प्रकल्पात सापडला. 

महसूलसह पोलीस विभाग घटनास्थळीसुनील कुकडे या युवकाच्या शोधासाठी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंधे यांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट देऊन शोधकार्यात येत असलेल्या अडचणीचा आढावा घेतला.यावेळी सरपंच संदीप अल्हाट यांची उपस्थिती होती. तर रविवारी महसूलचे तलाठी बालाजी माने, रवी काठे, मंडळ अधिकारी अनमोड यांच्यासह बीट जमादार प्रल्हाद टकले, विनोद फुफाटे आणि पोलीस पाटील गजानन पाचपोर,ग्रामपंचायत सदस्य रणजित देशमुख, बाळू वानखडे,शेख अबरार,रमेश पवार,तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम राठोड यांच्यासह इतरांनी  त्या युवकाचा शोध लावण्यात मदत केली.

मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरूपुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह उतावळी प्रकल्पात शोध लागल्यानंतर ग्रामस्थ आणि महसूलचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रकल्पातून त्या मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत मात्र अद्यापही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा