चिखली : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माजी नगराध्यक्ष डॉ. चित्तरंजन डागा यांचे १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा दिलीप, मुली नूतन व सुनीता, जावई, सुना नातू डॉ. भूषण डागा यांच्यासह मोठा आप्त परिवार आहे. संपूर्ण परिवारात ह्यबाबुजीह्ण म्हणून ओळखले जाणारे डॉ. चित्तरंजन डागा अत्यंत विनोदी आणि मनमिळावू होते. आपल्या वैद्यकीय सेवेने शहरासह ग्रामीण भागातील जनतेची मने त्यांनी जिंकून घेतली होती. चिखली नगर परिषदेचे अध्यक्षपद, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, चिखली अर्बन बँकेचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद भूषविण्यासह विविध संस्था-संघटनांमध्ये ते सक्रिय होते. याशिवाय आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही त्यांनी भोगला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते घरीच होते. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिखलीचे माजी नगराध्यक्ष डागा यांचे निधन
By admin | Updated: September 16, 2014 18:34 IST