शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सध्याचे सरकार फसवे - राहुल बोंद्रे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:22 IST

चांडोळ: सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार हे नागरिक व शेतकर्‍यांसाठी फसवे, खोटे आश्‍वासन देणारे सरकार आहे, असे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी इरला येथे सभेत केले. 

ठळक मुद्दे इरला येथे काँग्रेसच्या शाखेची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कचांडोळ: सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार हे नागरिक व शेतकर्‍यांसाठी फसवे, खोटे आश्‍वासन देणारे सरकार आहे, असे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी इरला येथे सभेत केले. चांडोळ गणांतर्गत येणार्‍या इरला व इरलावाडी येथे काँग्रेस व युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन ५ नोव्हेंबरला करण्यात आले होते. शाखाचे उद्घाटन धाड रिजवान सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून धाड जि.प. सदस्य रिजवान सौदागर, बुलडाणा, पं.स. सभापती रसुल खान, पं.स. सदस्य अमोल तायडे, पंडित चाटे, चाँद मुजावर, चिखली युवक काँग्रेसचे अध्यक्ष रमेश सुरडकर, सरचिटणीस गजानन घायाल, जाफ्राबादचे सुरेश गवळी, उमेश दांडगे, अनिल फेफाळे, नंदू शिंदे, सरपंच रामदास शेळके, सुनील चांदा, गजानन मरमट, मदन जंजाळ, हरुण पठाण, राजू धनावत, शिवाजी देशमुख, बबलू गुजर, शे. नदीम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभू वाघ होते. जि.प. सदस्य रिजवान सौदागर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकार सध्या मस्त; मात्र जनता त्रस्त अशी स्थिती आहे. आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली तरी या सरकारवर काही फरक पडत नाही. जिल्ह्याचे कृषी मंत्री असूनसुद्धा काही फायदा नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक शिवाजी शाळेचे शिक्षक संजय वानखेडे व विजय वाघ यांनी केले. आभार मोहन खंडागळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं. सदस्य दीपक मुर्‍हाडे, राजू मुर्‍हाडे, गणेश पुढारी, साहेबराव जंजाळ, भास्कर वाघ, तुकाराम खंडागळे, अण्णासाहेब खंडागळे, दिलीप सत्तावन, पन्नालाल मुर्‍हाडे, विजय मुर्‍हाडे व अन्य उपस्थित होते. दरम्यान, बोलताना आ. बोंद्रे यांनी पूर्वीचा १८ मतांचा येथील रेकॉर्ड तुटणार असल्याचे सांगितले. 

प्रत्येक गावात शाखा स्थापन करणार!चांडोळ परिसरातील प्रत्येक गावागावात जाऊन काँग्रेस व युवक काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात येईल. ग्राम इरला येथूनच अभियानास सुरुवात झाल्याचे गजानन मरमट यांनी यावेळी कार्यक्रमात स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रे