शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

लोणार सरोवराचे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:27 IST

सरोवराच्या पाण्याचा रंग नेमका कशा मुळे बदलला याची जिज्ञासा प्रत्येकाला आहे.

ठळक मुद्दे हे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटक सरोवर काढावर गर्दी करत आहेत.पर्यटक सध्या सेल्फी काढण्यात मग्न आहेत. आवश्यक खबरदारी येथे घेतल्या जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

- किशोर मापारी लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराचा रंग बदलल्यामुळे आणि कोरोना संसर्गानंतर अनलॉकच्या दिशेने पावले पडत असल्याने लोणार सरोवराचे हे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटक सरोवर काढावर गर्दी करत आहे. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी येथे घेतल्या जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.सरोवराच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून लालसर गुलाबी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातून पर्यटक येथे येत आहेत. सरोवराच्या पाण्याचा रंग नेमका कशा मुळे बदलला याची जिज्ञासा प्रत्येकाला आहे.तीन ते चार दिवसापासून सरोवरातील पाण्याचा रंग हा बदलेला असून सरोवराच्या काठवर जावून पर्यटक सध्या सेल्फी काढण्यात मग्न आहेत.मात्र येथील आनंद लुटतांना सुरक्षीत शारीरिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महसूल, पोलिस व वन्यजीव विभागने त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रसंगी नीरीचे एक पथकही येथे पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. वन्य जीवचे विभागीय वन अधिकारी यांनीही येथे शनिवारी भेट दिली.बुलडाणा शहराच्या दक्षिण पूर्व (आग्नेय) दिशेला १०५ किमी अंतरावर उल्कापातामुळे हे सरोवर बनले आहे. राज्यातील सर्वात छोट्या पक्षी अभयारण्याचा दर्जा ही या सरोवराला दिला गेला आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील हायपर व्हेलॉसिटी मेटीयोराईट इम्पॅक्टने तयार झालेले जगातील तिसºया क्रमांकाचे खाºया पाण्याचे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ४६४.६३ मीटर असून खोली १५० मीटर आहे. त्याचा आकार अंडाकृती असून पूर्व-पश्चिम व्यास १,७८७ मीटर तर उत्तर-दक्षीण व्यास १,८७५ मीटर आहे. येथील पुरातन मंदिरामधील ब्रिक्सचे (विटा) आयुर्मानही जवळपास दहा हजार वर्षाचे असल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरLonarलोणारbuldhanaबुलडाणा