शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भाऊबीज निमित्त बसस्थानकात तोबा गर्दी

By अनिल गवई | Updated: November 14, 2023 12:19 IST

नादुरूस्त बसेसही महामंडळासाठी डोके दुखी ठरत असल्याने एसटीचे अनेक शेड्युल्ड दररोजच रद्द होत असल्याचे दिसून येते.

अनिल गवई, खामगाव: दीपावली, भाऊबीज सणाच्या अनुषंगाने बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किेंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने, एसटी महामंडळाचे जादा बसेसचे नियोजन पुरते कोलमडल्याचे चित्र आहे. दरम्यान, नादुरूस्त बसेसही महामंडळासाठी डोके दुखी ठरत असल्याने एसटीचे अनेक शेड्युल्ड दररोजच रद्द होत असल्याचे दिसून येते.

दीपावली सणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. मात्र, खामगाव आगारात नादुरूस्त बसेसची संख्या अधिक आहे. दररोज कोणत्या कोणत्या मार्गावरील बस नादुरूस्त होत आहे. त्यामुळे जादा बसेसचे नियोजन करताना खामगाव आगाराची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा आहे.

प्रवाशांचे पहिले प्राधान्य एसटीलाच...

दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे एसटीतील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे.ऐन दिवाळीत चार बसेस नादुरूस्त

खामगाव आगारातील मार्गस्थ बसेस नादुरूस्त होण्याच्या प्रमाणात गत काही दिवसांत वाढ झाली आहे. ऐन दीवाळीत चार मार्गस्थ बसेस नादुरूस्त झाल्या. यात एक बस शिरूर आगारात असून, जालना, बुलढाणा, आणि जळगाव खांदेश येथील आगारात एक नादुरूस्त स्थितीत उभी असल्याची माहिती आहे.पुणे शेड्युल्डचा पत्ता नाही

दीपावलीसाठी गावी आलेल्या प्रवाशांना परतीसाठी गत दोन दिवसांत एकही बस लावण्यात आलेली नाही. बसेस अभावी लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येत नसल्याचे खामगाव आगारातील सुत्रांचे म्हणणे आहे. अकोला, अमरावती, शेगाव आगाराच्या बसेस त्या त्या स्थानकातूनच भरून येत अाहेत.

टॅग्स :khamgaonखामगावstate transportएसटी