शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

कोरड्या जमिनीवर तणनाशक फवारल्यामुळे पिकांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:10 IST

जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत. तसेच पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळेही पिके पिवळी पडली आहेत.संपूर्ण राज्यात खरीप हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, गत काही दिवसांमध्ये पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर पिकांवर सुद्धा व्हायरस आल्याची अफवा काही भागात पसरली आहे. वºहाडात पावसाने दडी दिली होती. तर काही भागात सुरूवातीपासूनच मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत ओल नसल्याने पिकांची हवी तशी वाढ झाली नाही. त्यातच तण वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणी केली. जमिनीत ओल नसल्यामुळे पिकांना पुरेसे पोषण मिळाले नाही. त्यातच तणनाशकांची फवारणी करण्यात आल्यामुळे पिकांना शॉक बसला. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत.शेतकरी अनेक वर्षांपासून शेतात एकाच पिकाची पेरणी करतात. शेतात पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट केली तर मातीचा पोत सुधारतो. मात्र सातत्याने एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्य मिळत नाही. अमरावती विभागात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबिनची पेरणी करतात. सोयाबिन नगदी पिक असल्यामुळे दरवर्षी एकाच पिकाची पेरणी करण्यात येते. सोयाबिन व मका पिकाला सर्वात जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. शेतकरी पिकांना नत्र, स्पूरद आणि पालाश (एनपीके) ही मुख्य अन्नद्रव्य देतात. मात्र सुक्ष्म अन्नद्रव्य देत नाहीत. सध्या पिकांना झिंक, मंगल, तांबे, लोह ही सुक्ष्म अन्नद्रव्ये व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य मिळाले नसल्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडली आहेत. शेतकºयांनी पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट खत दिले तर पिके पिवळी पडत नाहीत.उगवणीपूर्व तणनाशकांच्या फवारणीकडे पाठपिक पेरणी करण्यापूर्वीच उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी केली तर तण उगवत नाही. पिकांची पेरणी केल्यानंतर तसेच तण उगवल्यानंतर लगेच तणनाशकांची फवारणी केली तर पिकांना फटका बसतो. त्यामुळे उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.

जमिनीत ओल नसताना नणनाशकांची फवारणी करण्यात आली. त्याचा पिकांना शॉक बसल्याने पिके पिवळी पडली आहेत. तसेच शेतात एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडतात.- जी. बी. गिरीतालुका कृषि अधिकारी, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी