शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या अंदाजावर पीक लागवडीचे नियोजन

By admin | Updated: May 18, 2015 01:49 IST

शेतकरी विचारात ; सोयाबीन, कपाशी या दोन्ही पिकांना प्राधान्य.

बुलडाणा : गत दोन वर्षांपासून सोयाबीन पिकावर गंडांतर येत आहे. २0१३ मध्ये अतवृष्टी तर २0१४ मध्ये विलंबाने आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. यामुळे शेतकर्‍यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यंदाही कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने सादर केले आहे. असे असले तरी शेतकरी मात्र पावसाचा अंदाज घेऊनच पीक लागवडीचे नियोजन करणार असल्याचे संकेत आहेत. २0१३ च्या खरीप हंगामात अतवृष्टीने सोयाबीन पीक शेतकर्‍यांच्या हातचे पूर्णत: गेले. यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढविणार असल्याचे दिसते. या दृष्टीने कृषी विभाग व खासगी कृषी केंद्र बियाण्यांचे नियोजन करीत आहे. दोन वर्षांपासून सोयाबीनमध्ये नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदाचा हंगाम मात्र अर्धा सोयाबीन व अर्धी कपाशी, अशीच लागवड राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात ३0 किलो वजनाच्या बियाण्यांचा भाव दोन हजार रुपये आहे. कंपन्यांचे बियाणे बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. मागील अतवृष्टी व खराब हवामानाचा अनुभव पाहता यंदा पावसाच्या अंदाजावरच कपाशी की सोयाबीन, या पीक लागवडीला प्राधान्य राहणार आहे. अनेक खासगी कंपन्या सोयाबीन बियाणे उगवण शक्तीची हमी देत आहे; पण प्रत्यक्षात याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. खासगी विक्रेत्यांकडून काळाबाजार होणार नाही, याची विशेष खबरदारी कृषी व पं.स. विभागाला घ्यावी लागणार आहे. तसेच हंगामापूर्वी कृषी विभागाने पावसानुरूप कोणते बियाणे उपयुक्त ठरेल, याचे मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. भरारी पथकाद्वारे बोगस बियाण्यांवर लगाम लावणेही गरजेचे आहे. खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशी या मुख्य पिकांची शेतकरी पावसाच्या अंदाजानुसार कमी-अधिक प्रमाणात लागवड करणार आहेत.