शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:38 IST

३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई करणाºया बँकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. तरीही बँकांमध्ये कर्ज वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू असून लक्षांकाच्या केवळ १८ टक्के शेतकऱ्यांनाच २९ जून पर्यंत कर्ज वाटप करण्यात आले. ३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे. त्यामुळे २ लाख ९६ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.लॉकडाऊनमुळे शेतकºयांचा शेतमाल घरातच पडून आहे. त्यामुळे, शेतकºयांसमोर खरीपाची पेरणी करण्याचे आव्हान होते. शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देउन दिलासा दिला. मात्र, बँकाकडून शेतकºयांना कर्ज वितरण करण्यास मोठा विलंब होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी पीक कर्ज मिळेल,अशी आशा असलेल्या शेतकºयांनी बँकाकडे अर्ज केले. मात्र, विविध दाखल्यांसाठी बँकाकडून अडवणुक होत असल्याने अनेक शेतकरी अजुनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.पीक कर्ज वाटपाची गती संथ असल्याने पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेउन बँकांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पीक कर्ज वाटपात दिंरगाई करणाºया बँकाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही बँकांची पीक कर्ज वाटपाची गती वाढली नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एक लाख ३० हजार शेतकरी पीक कर्जासाठी पात्र आहेत. यापैकी २९ जून पर्यंत बँकांनी ६६ हजार शेतकºयांना ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अजुनही ६४ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अर्ध्यापेक्षा अधीक शेतकºयांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.मृग नक्षत्रात जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवस पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेकांचे सोयाबीन न निघाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पैशांची गरज असताना बँकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.लक्ष्यांक दूरचयावर्षी जिल्ह्यातील बँकांना तीन लाख ६२ हजार शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ६६ हजार शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २ लाख ९४ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २४६० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य आहे. त्यापैकी ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.प्रत्येक शेतकºयाला कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या ५१ टक्के शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच शेतकºयांना पीक कर्ज मिळावे,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- उत्तम मनवर, व्यवस्थापक,अग्रणी बँक, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी