शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे अतोनात नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:39 IST

नांदुरा: नांदुरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी  वार्‍यासह झालेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारीसह  अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काटी,  धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, डिर्घी, चांदूर शिवारातील  पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्देवादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पिके जमीनदोस्तचार गावे सोळा तास अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: नांदुरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी  वार्‍यासह झालेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारीसह  अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काटी,  धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, डिर्घी, चांदूर शिवारातील  पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.  तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी  लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी  काही गावात वादळी वार्‍यामुळे जवळपास सर्वच पिकांचे  मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायती कपाशीची  कापूस फुटण्याची अवस्था असून, मक्याचे कणीस भरलेले  आहेत, ज्वारीलाही कणसे पडलेली आहेत. त्यामुळे  अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे ही सर्व पिके  जमीनदोस्त झाली आहेत. परिसरातील काटी, धानोरा,  विटाळी, सिरसोडी, बुर्टी, चांदूर, डिघी येथे मोठय़ा प्रमाणात  पिकांचे नुकसान झाले आहे.काटी येथील जवळपास ८0 टक्के शेतकर्‍यांचे कपाशी,  ज्वारी व मका पिके जमिनीवर आडवी झाल्याने शेतकर्‍यांचा  हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, पिकांची  अशी अवस्था पाहून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. 

चार गावे सोळा तास अंधारातबुधवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे रात्री ८ वाजेपासून  काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी चारही गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तब्बल १६ तास वीज गायब हो ती. गुरुवारी दुपारी १२ वाजता वीजपुरवठा पूर्ववत सुरू  झाला. १६ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्याने चारही  गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.  त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे  दोन एकरावरील मका व ३ एकरावरील कपाशी पूर्णपणे  उद्ध्वस्त झाली असून, हाती आलेले पीक गेले आहे. यामध्ये  मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता पुढे काय, असा  प्रश्न आहेच.- विष्णू त्र्यंबक हिवाळे, शेतकरी काटी

काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी येथील शेतकर्‍यांचे मोठे  आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभाग, कृषी  विभागाने तत्काळ नुकसानीचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना  नुकसान भरपाई द्यावी.- योगिता गावंडे, पं.स. सदस्य