शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘भाग्यश्री’ च्या वाटेत निकषांचा अडसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:14 IST

गतवर्षी या योजनेसाठी जिल्ह्यात केवळ ४२ लाभार्थी पात्र ठरले. योजनेसाठीचे निकष 'भाग्यश्री'च्या वाटेत अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

- सोहम घाडगे   लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकिय योजना म्हटले की, लाभासाठी अर्जांचा खच पडतो. कुणाची निवड करावी हे ठरवितांना प्रशासनाच्या नाकी नऊ येतात. मात्र 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेच्या बाबतीत याउलट चित्र आहे. गतवर्षी या योजनेसाठी जिल्ह्यात केवळ ४२ लाभार्थी पात्र ठरले. योजनेसाठीचे निकष 'भाग्यश्री'च्या वाटेत अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.मागील दोन वर्षांपासून शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री' योजना अंमलात आणली. स्त्रीभ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढावा हा या योजनेचा उद्देश आहे. आॅगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे बँकेत ५० हजार रुपये मुदतठेव म्हणून गुंतविण्यात येते. तर दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावे २५ हजार रुपये गुंतविण्यात येतात. एक मुलगी किंवा २ मुली असलेल्या महिलेने किंवा कुटूंब प्रमुखाने नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षाच्या आत ही शस्त्रक्रिया केलेली पाहिजे. अशी पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.एक किंवा दोन अपत्ये असणारी अनेक कुटूंब आपल्याकडे आहेत. परंतू त्यांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असतेच असे नाही. बºयाचदा माता-पित्यापैकी एकाने शस्त्रक्रिया केलेलीही असते. परंतू मुलगी जन्मल्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त कालवधीनंतर ही शस्त्रक्रिया झालेली असते. त्यामुळे ते दाम्पत्य या योजनेसाठी पात्र ठरत नाही. अशा कारणांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून योजनेची जनजागृती करण्याची गरज आहे.जनजागृतीच्या माध्यमातून योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ करून घेण्यास मदत होईल.

भाग्यश्री योजनेचे २०१७- १८ मध्ये १४ लाभार्थी होते. तर २०१८-१९ मध्ये हा आकडा ४२ आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होईल, यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे.- अरविंद रामरामेजिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण जि. प. बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना