शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 07:15 IST

यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था. करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील.

जळगाव जामोद (बुलढाणा) :  महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळ घटमांडणीचे भाकीत एक मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराजांनी जाहीर केले.

   यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था. करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू देशाचे काही वाकडे करू शकणार नाही. परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील, असे भविष्य वर्तवले.

विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासून मुक्कामाला

दरम्यान, घटामध्ये मांडलेल्या १८ धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी होते.

नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील.

परकीय देशाचा त्रास राहील

आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट राहील.

पाऊस

जुन : कमी व साधारण

जुलै : साधारण जून पेक्षा जास्त

ऑगस्ट : सर्व साधारण

सप्टेंबर : जास्त व् अवकाळी पाऊस

मोठ्या प्रमाणात अवकाळी

यावर्षी भरपूर पावसाळा असून जून सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसाचेसुद्धा थैमान राहील. त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील.

करव्या वरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर प्रचंड संकट येतील. त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा सहभाग असू शकतो. मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडीसुद्धा होईल.  पिकांवर रोगराई पसरेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवला.

भेंडवडची मांडणी

कापूस पिक     : सर्व साधारण

ज्वारी पिक     : साधारण भावात चांगले

सोयाबीन       : चांगले

तूर पिक       : साधारण

मुंग पिक       : साधारण

उडीद पिक      : सर्वसाधारण

तील पिक      : चागले

भादली : रोगराई जास्त

बाजरी पिक     : उत्तम

तांदूळ पिक     : साधारण/ भावात तेजी

मठ पिक सर्व : साधारण

जवस् पिक      : साधारण /नासाडी

लाख पिक      : साधारण भावत तेजी

वाटाणा पिक : साधारण

गहू पिक       : साधारण

हरबरा : साधारण/भाव कमी