शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:22 IST

सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात सरासरी ७० टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ८०० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६८८ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर खरीप हंगामाची पेरणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. परंतू दरवर्षी पाऊस लांबत असल्याने मृग नक्षत्रातील पेरणीचा मुहूर्त हुकत बेभरवश्याच्या या पावसाचा शेतकºयांना दरवेळी फटका बसतो. यंदा मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने बहुतांश शेतकºयांनी पेरणी उरकली. परंतू पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांच्या आनंदावर विरजण पडले. पावसाची दांडी, त्यात बोगस बियाण्यांचा फटका असे दुहेरी संकट शेतकºयांवर निर्माण झाले आहे. सध्या ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ६३ हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांमुळे, तर कुठे पाऊस न झाल्याने सोयाबीन उगवलेच नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. १ जुलैपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या ६८८ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. ८०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे बियाणे उगवलले नाही. तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या तक्रारीनंतर पंचनामे करण्यात येत आहेत. ज्या कंपन्या शेतकºयांसाठी सहकार्याची भूमिका ठेवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले.सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे क्षेत्रजिल्ह्यात एकूण पेरणीच्या ४ लाख ९ हजार २११ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन असते. सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे आहे. सोयाबीन पाठोपाठ जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र आहे. १ लाख ६८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा होतो. सध्या १ लाख ५५ हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली.

माझ्या पाच एकर शेतात मी १० जूनला सोयाबीनची पेरणी केली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. शेतात तुरळक ठिकाणी सोयाबीन उगवले. ते वखरुन दुबार पेरणी करावी लागत आहे.-गोपाल पाझडे, शेतकरी साखरखेर्डा.

सोयाबीन बियाणे उगवुन आले नाही. त्यामुळे मला दुबार पेरणी करावी लागली. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने आता पेरण्या यशस्वी झाल्या आहेत. आता मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.-आत्माराम नरवाडे,शेतकरी, सावळी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी