शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 15:59 IST

नियमांचे पालन न करणाºया ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगावा : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत नियमांचे पालन न करणाºया ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.  अनलॉक नंतर सव्वा महिन्याच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. विनाकारण बाहेर फिरणाºयांवर कारवाईसाठी पोलिसांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ ही मोहिम राबविली. दरम्यान, याच कालावधीत मोटार वाहन कायद्यानुसार ३२०० जणांवर दंडात्मक कारवाई करीत पोलिस प्रशासनाने सहा लक्ष ४०० रुपयांच्या दंडाची वसुली केली. हे येथे उल्लेखनिय!खामगावपासून नजीकच असलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाचे थैमान आहे. अकोला कनेक्शनमुळे खामगाव शहरात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढले आहे. खामगाव शहराला आता कोरोनाच्या समूह संक्रमणाचा धोका वाढीस लागला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नियमांचे पालन न करणाºयांविरोधात आॅपरेशन आॅलआऊट ही मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. या कालावधीत मोटार वाहन कायद्यासोबतच फौजदारी स्वरूपाच्या कारवाई देखील करण्यात येत आहेत.  अनलॉक कालावधीत सर्वत्र कारवाईची मोहीम थंडावली असताना, खामगाव शहर पोलिसांनी धडक मोहिम राबविली. १ जून ते ९ जुलैपर्यंत ४५ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. यामध्ये भादंवि कलम १८८, २६९, २७०, साथरोग अधिनियम (३), आपत्ती व्यवस्थापन कायदा (५१),  आणि महाराष्ट्र कोविड नियमावली नियम ११ अन्वये कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे सामान्यांना तसेच गरजूंना त्रास होणार नाही, याचीही खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेतली जात आहे. ३२०० वाहन धारकांकडून सहा लाखांवर दंड वसूल!अनलॉक कालावधीत खामगाव शहरात ३२०० वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फौजदारी कारवाईमध्ये ०६ (चारचाकी वाहने), ०७  (तीनचाकी वाहने) तर ३२ दुचाकी धारकांचा समावेश आहे. एका कारमध्ये ८ जण बसलेले आढळून आल्याने ही कार जप्त करण्यात आली. कोणताही दबाव झुगारत कारवाई करण्यात येत असल्याने मोठ्याप्रमाणात दंडात्मक वसुली होतेय. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईत कोणताही अतिरेक होत नाही.खामगाव शहर हे कोरोना विषाणूच्या समूह संक्रमणाच्या उंबरठ्यावर असून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. या वर्षात भौतिक सुखाच्या आहारी न जाता आपल्या गरजा मर्यादित ठेवत प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.-सुनिल अंबुलकरपोलिस निरिक्षक,खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस