शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकासह संस्थाध्यक्षाविरुद्ध फौजदारी खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:12 IST

हा खटला शाळेचे तत्कालीन शिक्षक राम बुरंगी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चालणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : लाखनवाडा येथील समता बहूउद्देशीय शिक्षण संस्थेव्दारा संचालित गवंढाळा येथील महात्मा ज्योतिबा फुले येथील विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक रामेश्वर राऊत, संस्थाध्यक्ष सौ. आशा राऊत व सचिव महादेव राऊत यांचेविरूध्द शाळा प्राधिकरण, अमरावती यांच्या आदेशाचा भंग केल्याचे आरोप आहे. त्यावरून खामगावन्यायालयात फौजदारी खटला चालणार आहे.हा खटला शाळेचे तत्कालीन शिक्षक राम बुरंगी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चालणार आहे. प्रकरणात तक्रारकर्ते बुरंगी यांचेतर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर भाटे, अ‍ॅड. केतन भाटे व अ‍ॅड. भालतडक काम सांभाळत आहेत.शाळेचे तत्कालीन शिक्षक बुरंगी यांना सेवेतून कमी करण्यात आल्यामुळे त्यांनी याविरूध्द शाळा प्राधिकरण, अमरावती येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिका मंजुर होवून बुरंगी यांना थकीत पगारासह रूजू करण्याचे आदेश संस्थेला २००९ मध्ये देण्यात आले होते. त्यानुसार बुरंगी यांना ३० सप्टेंबर २००९ रोजी सेवेत रूजू तर करण्यात आले. परंतु थकीत पगार देण्यात आला नाही.याबाबत अनेकदा बुरंगी यांनी विनंती करूनही वर नमूद आरोपींनी शाळा प्राधिकरणच्या आदेशानुसार थकीत पगार अदा केला नाही. सुमारे ७० हजार रुपये थकीत पगाराची रक्कम आहे. यासंदर्भात बुरंगी यांनी आरोपींविरूध्द खाजगी फौजदारी खटला भरला त्याविरूध्द आरोपींनी खामगाव सत्र न्यायालयात याचिका केली होती. परंतु सत्र न्यायाधिश देशपांडे यांनी आरोपींची याचिका खारीज करून त्यांचेविरूध्द फौजदारी खटला चालविण्याचा आदेश कायम ठेवला. या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावCourtन्यायालय